७९ हजारांचे दारूचे रसायन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:15 IST2021-01-14T04:15:16+5:302021-01-14T04:15:16+5:30

मानवत : तालुक्यातील मंगरूळ बु. येथे रसायनाद्वारे हातभट्टी तयार करण्याचा प्रयत्न १३ जानेवारी रोजी साडेअकरा वाजता हाणून पाडत पोलिसांनी ...

Chemicals worth Rs 79,000 seized | ७९ हजारांचे दारूचे रसायन जप्त

७९ हजारांचे दारूचे रसायन जप्त

मानवत : तालुक्यातील मंगरूळ बु. येथे रसायनाद्वारे हातभट्टी तयार करण्याचा प्रयत्न १३ जानेवारी रोजी साडेअकरा वाजता हाणून पाडत पोलिसांनी ७९ हजार रुपयांचे १४०० लिटर सडके रसायन आणि ४५ लिटर गावठी दारू जप्त केली. पोलिसांच्या या कारवाईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील मंगरूळ बु. येथे हातभट्टी दारूची चोरटी विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, कर्मचारी उद्धव माने, नारायण सोळंके, मुंजाभाऊ पायघन यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता सात प्लास्टिकच्या बॅरलमध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे १४०० लिटर रसायन भरून ठेवले होते. तसेच ४५ लिटर गावठी दारूही आढळून आली. पोलिसांनी रसायन नष्ट केले आहे. याप्रकरणी बासू भोलेनाथ काळे व फुलाबाई बापूनाथ पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.

फोटो - मानवत तालुक्यातील मंगरूळ येथे दारूचे रसायन नष्ट करताना पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, उद्धव माने, नारायण सोळंके, मुंजाभाऊ पायघन.

Web Title: Chemicals worth Rs 79,000 seized