'राजेश, मला रिझल्ट दे!' अजितदादांच्या शेवटच्या फोनची आठवण अन् आ. विटेकर ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:37 IST2026-01-28T14:36:29+5:302026-01-28T14:37:38+5:30

Ajit Pawar Death: प्रचार दौरा अर्धवट सोडून आमदार राजेश विटेकर बारामतीकडे रवाना; अजितदादांच्या आठवणीने डोळे ओलावले.

Ajit Pawar Death: "Rajesh, do whatever you want, but give me the results!" That last call from Dada 3 days ago and MLA Vitekar burst into tears. | 'राजेश, मला रिझल्ट दे!' अजितदादांच्या शेवटच्या फोनची आठवण अन् आ. विटेकर ढसाढसा रडले

'राजेश, मला रिझल्ट दे!' अजितदादांच्या शेवटच्या फोनची आठवण अन् आ. विटेकर ढसाढसा रडले

पाथरी : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'कारभारी' व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांना आपल्या भावना अनावर झाल्या. जिल्हा परिषदेच्या प्रचारात मग्न असतानाच ही वार्ता धडकली आणि क्षणार्धात विटेकरांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या धक्क्याने त्यांनी आपला संपूर्ण प्रचार दौरा तातडीने थांबवला आहे.

तीन दिवसांपूर्वीची ती शेवटची आठवण 
आमदार राजेश विटेकर यांनी अजितदादांसोबतच्या शेवटच्या संवादाची एक आठवण अत्यंत जड अंतःकरणाने सांगितली. ३ दिवसांपूर्वी जेव्हा विटेकर जिल्हा परिषदेच्या प्रचार रॅलीत होते, तेव्हा अचानक दादांचा फोन आला. रॅलीच्या कोलाहलात बोलता येत नसल्याने विटेकर रस्त्यावरील एका दुकानाच्या आडोशाला गेले आणि तिथे दादांशी बोलले. दादांनी नेहमीच्या करारी आवाजात सांगितले होते, "राजेश, काय करायचं ते कर, पण मला रिझल्ट दे! तडजोड करावी लागली तरी चालेल, पण मला विजय हवाय." कामाप्रती दादांची हीच जिद्द आता विटेकरांच्या डोळ्यांसमोर वारंवार येत आहे.

प्रचाराचा नारळ अर्ध्यावरच सोडला 
मानवत तालुक्यातील खराब येथे प्रचारासाठी विटेकर दाखल झाले होते. बातमी कळताच ते सुन्न झाले. काही काळ त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. कार्यकर्त्यांचे छत्र हरवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर ते मानवत येथील बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि दुपारी १२ वाजता बारामतीकडे रवाना झाले. जिल्हाभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावनिक झाले आहेत.

Web Title : अजित पवार का आखिरी फोन याद कर विधायक विटेकर रो पड़े: 'मुझे रिजल्ट दो!'

Web Summary : अजित पवार के निधन की खबर से विधायक राजेश विटेकर भावुक हो गए, और उन्होंने अपना प्रचार रोक दिया। उन्हें पवार का आखिरी फोन याद आया जिसमें उन्होंने चुनाव जीतने की बात कही थी। विटेकर प्रचार रोककर बारामती के लिए रवाना हो गए, जिससे पार्टी कार्यकर्ता भावुक हो गए।

Web Title : MLA Weeps Remembering Ajit Pawar's Last Call: 'Give Me Results!'

Web Summary : News of Ajit Pawar's death overwhelmed MLA Rajesh Vitekar, halting his campaign. He recalled Pawar's last call demanding election victory, emphasizing his dedication. Vitekar, stunned, suspended campaigning and departed for Baramati, leaving party workers emotional.