मास्क न वापरणाऱ्या ६३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST2021-03-23T04:18:39+5:302021-03-23T04:18:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जिंतूर : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व वाहनांची कागदपत्रे स्वत:जवळ न ठेवणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर ...

Action on 63 vehicles without masks | मास्क न वापरणाऱ्या ६३ वाहनांवर कारवाई

मास्क न वापरणाऱ्या ६३ वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

जिंतूर : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व वाहनांची कागदपत्रे स्वत:जवळ न ठेवणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर जिंतूर पोलीस व परिवहन कार्यालयाने संयुक्त कारवाई करताना ६३ वाहने जप्त केली आहेत. ही सर्व वाहने एस. टी. महामंडळाच्या आवारात लावण्यात आली आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त, प्रभारी पोलीस निरीक्षक शिवसांभ स्वामी, पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे, मोटार वाहन निरीक्षक अभिजीत तरकसे, जयंत देवरे यांच्यासह ३५ पोलीस अंमलदार व कर्मचाऱ्यांनी केली. सोमवारी सकाळपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिंतूर शहरातील साठे चौक, शिवाजी चौक व वरुड रोड पॉईंटवर ही कारवाई करण्यात आली. काही वाहनांवर पोलिसांनी मशीनद्वारे दंड आकारला आहे तर आरटीओंनी जप्त केलेली वाहने एस. टी. महामंडळाच्या परिसरात लावली आहेत. या कारवाईत ६३ वाहने जप्त करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून त्यांना दंड आकारण्यात आला आहे.

Web Title: Action on 63 vehicles without masks