गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:59+5:302021-02-24T04:18:59+5:30

परभणी : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार समाजाला स्वच्छतेकडे नेणारे आणि अंधश्रद्धामुक्त करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांची कास धरून कार्य ...

Accept Gadge Baba's thoughts | गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारा

गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारा

परभणी : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार समाजाला स्वच्छतेकडे नेणारे आणि अंधश्रद्धामुक्त करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांची कास धरून कार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी डॉ.चव्हाण बोलत होते. येथील संत गाडगेबाबानगर येथील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.चव्हाण म्हणाले, गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे, ही नेमकी जाणीव असलेले संत होत. गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छतेचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संत होते, असे डॉ.चव्हाण म्हणाले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संपत नंद, महासचिव सुभाष सोनवणे, साळवे, अशोक वायवळ, लक्ष्मण शिंदे, सर्जेराव सदर, अमोल नंदनवरे, अमोल वाघमारे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Accept Gadge Baba's thoughts