गंगाखेड (जि. परभणी): तालुक्यातील टोकवाडी जवळील निसर्गरम्य पेडजाई देवीच्या टेकडीवर तेराव्या शतकातील एका भव्य मंदिराचे भग्न अवशेष आढळून आले आहेत. परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा समितीचे सदस्य प्रा. डॉ. अविनाश खोकले यांनी केलेल्या पाहणीत हा ऐतिहासिक ठेवा समोर आला असून, यामुळे मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडली आहे.
मंदिराची वैशिष्ट्ये आणि स्थापत्यशैली
हे मंदिर काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेले असून ते पूर्वाभिमुख होते. आजही या ठिकाणी मंदिराचे गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुख्य आसनपीठ आणि कोरीव स्तंभांचे अवशेष पाहायला मिळतात. इतिहासकारांच्या मते, राणीसावरगाव येथील रेणुका देवी मंदिर आणि या मंदिराचा कालखंड एकच असावा. विशेष म्हणजे, सुमारे दोनशे वर्षांपूर्वी या भग्न मंदिराच्या जागी दगड-विटांचे नवीन बांधकाम करण्यात आले, ज्यावर इंडो-इस्लामिक शैलीचा प्रभाव दिसून येतो.
प्राचीन जलकुंडाचे नवल
मंदिरापासून काही अंतरावर काळ्या दगडात बांधलेले एक प्राचीन जलकुंड सापडले आहे. कोणत्याही आधुनिक साहित्याशिवाय तयार केलेल्या या कुंडात मे महिन्याच्या कडक उन्हातही पाणी उपलब्ध असते, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.
संवर्धनाची गरज
ही टेकडी उंचावर असल्याने इथून २५ किलोमीटर परिसरावर नजर ठेवता येते, जे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. मात्र, परिसरात सुरू असलेल्या खोदकामामुळे या वारशाला धोका निर्माण झाला असून, पुरातत्त्व विभागाने याचे संवर्धन करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
Web Summary : Gangakhed unearths 13th-century temple ruins on Pedjai Devi hill, revealing black basalt architecture, ancient water tank, and Indo-Islamic influences. Preservation urged due to ongoing excavations.
Web Summary : गंगाखेड में पेडजाई देवी पहाड़ी पर 13वीं सदी के मंदिर के अवशेष मिले, जिसमें काले बेसाल्ट वास्तुकला, प्राचीन जलकुंड और इंडो-इस्लामिक प्रभाव उजागर हुए। खुदाई के कारण संरक्षण का आग्रह किया गया है।