जिल्ह्यात ५४ कोरोनाबाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:10+5:302021-06-01T04:14:10+5:30

परभणी : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ५४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन दिवसापासून ...

54 corona affected in the district | जिल्ह्यात ५४ कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यात ५४ कोरोनाबाधितांची नोंद

परभणी : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ५४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन दिवसापासून बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सोमवारी आरोग्य विभागाला १ हजार २४९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार १३ अहवालांमध्ये ३६ आणि रॅपिड टेस्टच्या २१६ अहवालांमध्ये १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

बाधित रुग्णांची संख्या घटल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यू होतच आहेत. सोमवारी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात १, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९ हजार ९२० झाली असून, त्यापैकी ४४ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एक हजार २३१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार १३४ रुग्ण उपचार घेत आहेत.

१४१ रुग्णांना सुटी

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढत आहे. सोमवारी १४१ रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

Web Title: 54 corona affected in the district