जिल्ह्यात कोरोनाचे २५ रुग्ण, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST2021-06-30T04:12:36+5:302021-06-30T04:12:36+5:30

मागील तीन दिवसांपासून नवीन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी ३३ रुग्ण आढळले होते, यानंतर मंगळवारी रुग्णसंख्या कमी ...

25 corona patients die in district | जिल्ह्यात कोरोनाचे २५ रुग्ण, एकाचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे २५ रुग्ण, एकाचा मृत्यू

मागील तीन दिवसांपासून नवीन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी ३३ रुग्ण आढळले होते, यानंतर मंगळवारी रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून आले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५० हजार ८९१ इतकी झाली आहे तर एकूण कोरोनामुक्त झालेले रुग्ण ४९ हजार ३३३ आहेत. आजपर्यंत १,२८२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला तर सध्या २७६ रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात ४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील दोन दिवसांपासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मंगळवारी साडेतीन हजार चाचणी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: 25 corona patients die in district