कचरा गाडीच्या धडकेत १२ वर्षीय मुलगी जागीच ठार; वडिलांची भेट ठरली अखेरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 03:00 PM2019-11-25T15:00:44+5:302019-11-25T15:01:33+5:30

नागरिकांनी गाडीच्या काचा फोडल्या.

12-year-old girl killed in accident of garbage vehicle; Dad's meeting was final | कचरा गाडीच्या धडकेत १२ वर्षीय मुलगी जागीच ठार; वडिलांची भेट ठरली अखेरची

कचरा गाडीच्या धडकेत १२ वर्षीय मुलगी जागीच ठार; वडिलांची भेट ठरली अखेरची

Next
ठळक मुद्देपरभणी शहरातील विद्यानगर भागात अपघात

परभणी : भरधाव वेगात जाणाऱ्या महानगरपालिकेच्या कचरा गाडीची धडक बसून १२ वर्षीय विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील विद्यानागर भागात घडली.

श्रुती नागोराव भराडे (रा.वंगीरोड, परभणी) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. श्रुतीचे वडील नागोराव भराडे हे ऑटोचालक असून, विद्यानगर भागातील पाइन्टवर ते ऑटोरिक्षा उभा करतात. सोमवारी दुपारी श्रुती वडिलांना भेटण्यासाठी सायकल घेऊन विद्यानागर ऑटो पॉइंटवर आली होती. वडिलांना भेटून परत जात असतानाच त्याच ठिकाणी नांदखेडा रोडहुन भरधाव वेगाने येणाऱ्या कचरा गाडीने (क्र.एम.एच.२२/ए.एन.७१९) तिच्या सायकलला जोराची धडक दिली. त्यात श्रुतीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने संतप्त नागरिकांनी गाडीच्या काचा फोडल्या. दरम्यान नानालपेठ पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: 12-year-old girl killed in accident of garbage vehicle; Dad's meeting was final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.