'मरसाला' या रंगात रंगायला आतूर झालेलं नवं तरुण जग

By Admin | Updated: February 5, 2015 19:38 IST2015-02-05T19:38:52+5:302015-02-05T19:38:52+5:30

हा आहे २0१५ या वर्षाचा रंग. गेल्या काही वर्षांपासून फॅशनजगात एक नवीन लाट आली आहे. प्रत्येक येणार्‍या वर्षाचा एक रंग ठरवण्याची. तर या वर्षाचा रंग आहे, मरसाला.

The new young world that has become obsessed with the colors of 'Marasala' | 'मरसाला' या रंगात रंगायला आतूर झालेलं नवं तरुण जग

'मरसाला' या रंगात रंगायला आतूर झालेलं नवं तरुण जग

>‘मरसाला’ हे काय आहे?
हा आहे २0१५ या वर्षाचा रंग. गेल्या काही वर्षांपासून फॅशनजगात एक नवीन लाट आली आहे. प्रत्येक येणार्‍या वर्षाचा एक रंग ठरवण्याची. तर या वर्षाचा रंग आहे, मरसाला.
मरसाला हे खरं तर एका वाइनचं नाव. तिचा रंग काळपट लाल, खरं तर ‘मरून’च्या जवळ जाणारा.
या ‘मरसाला’ रंगाची सध्या जगभरात क्रेझ आहे.
आणि येत्या व्हॅलेण्टाइन डेच्या निमित्तानं तर याच रंगाचा मेकअप, याच रंगाची गिफ्ट्स, बॅगा, कपडे असं काय-काय चर्चेत आहे.
अनेक मुली तर यानिमित्तानं केस या ‘मरसाला’ रंगात रंगवून घेत आहेत.
फॅब फेब सेलिब्रेशनचाच एक भाग म्हणून मार्केटिंग तंत्रही आता तुम्ही ‘मरसाला’ जास्तीत जास्त वापरा, नव्या तरुण जगाचा भाग व्हा, फ्रेश फिल करा असा मॅसेज देत या ‘मरसाला’चं जोरदार कॅम्पेनिंग करत आहेत.
कसा असतो हा रंग हे पहायचं असेल तर गूगलवर जाऊन marsala असं क्लिक करून पहा..
गम्मत आहे हे नक्की.

Web Title: The new young world that has become obsessed with the colors of 'Marasala'