शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फाईट लाईक अ हेल

By admin | Updated: July 24, 2014 19:37 IST

इएसपीएन’ चॅनल नेहमी पाहणार्‍या प्रत्येकाला ‘स्टुअर्ट स्कॉट’हे नाव माहितीच असतं.पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो

इएसपीएन’ चॅनल नेहमी पाहणार्‍या प्रत्येकाला ‘स्टुअर्ट स्कॉट’ हे नाव माहितीच असतं.
पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, स्टुअर्ट स्कॉट हे इएसपीएन स्पोर्ट चॅनलचे स्टार अँँकर. या माणसाच्या आवाजात अशी काही जादू की पाहणार्‍यानं पाहण्यापेक्षा त्यांचं बोलणं ऐकतच रहावं. त्यांना नुकताच अमेरिकेतल्या लॉँज एंजेलीस शहरात ‘इस्पी’ अर्थात एक्सलन्स इन स्पोर्ट्स परफॉर्मन्स इयरली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तोही जिम्मी व्ही अवार्ड यांच्या नावे. आत्यंतिक चिकाटी असणार्‍या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो. जिम्मी व्ही स्वत:ही बास्केटबॉल कोच होते. त्यांना हाडांचा कर्करोग झाला होता. मृत्यूपूर्वी दोनच महिने आधी त्यांनी आपल्या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी एक भाषण केलं होतं, त्यात ते म्हणाले होते. 
‘डोण्ट गिव्ह अप, डोण्ट गिव्ह अप एव्हर’
तर त्या जिम्मी व्ही यांच्यासारख्या चिवट खेळाडूच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार स्टुअर्ट स्कॉट यांना देण्यात आला. कारण सध्या स्टुअर्ट स्कॉटही कॅन्सरशी लढताहेत. गेल्या ७ वर्षांपासून त्यांचा कॅन्सरशी असलेला हा संघर्ष सुरूच आहे. आणि आजाराचा सामना करत असतानाही त्यांचं काम, त्याच्यावरची निष्ठा, त्यातला उत्स्फूर्त उत्साह अजिबात कमी झालेला नाही.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्कॉट यांनी एक भाषण केलं, खरंतर गप्पाच मारल्या. त्यावेळी स्कॉट म्हणाले, ‘लिव्ह, फाईट लाईक अ हेल. जगायचंय ना तर मग पराकोटीचा संघर्ष करायलाच हवा. हार मानून कसं चालेल. आपण आपली लढाई पूर्ण ताकदीनं लढलीच पाहिजे. आणि समजा आपण दमलोच, तर आपल्यासाठी लढणारी माणसं असतात, त्यांना प्रयत्न करू द्यायला पाहिजे. आपण थोडं बाजूला व्हावं, थोडा आराम करावा आणि आपल्यावर प्रेम करणार्‍या माणसांना करू द्यावेत आपल्याला जगवण्याचे, उमेद देण्याचे प्रयत्न. ते प्रयत्नही आपल्याला खूप मदत करतात, जगवतात. ‘मला नाहीच जमणार’ असं म्हणून हातपाय गाळून बसण्यात काहीच हाशील नसतं. तसं करण्यापेक्षा जरा श्‍वास घ्यावा आणि आपली माणसं जे प्रयत्न करतात त्यांना करू द्यावेत, त्यात मदत करावी. मी तरी दुसरं काय करतोय. मला जगवणारे डॉक्टर, सिस्टर्स, माझे कुटुंबीय माझ्या वतीनं माझ्या दिशेनं येणार्‍या मरणाशी लढतातच आहेत. मागच्याच आठवड्यात माझी एक किडनी फेल झाली. आपण उभं राहू शकू असंही वाटत नव्हतं. आजही माझ्या शरीरात असा एक अवयव नाही जिथं नळ्या आणि रॉड टाकलेले नाहीत. पण तरीही मला वाटतंय की, ही लढाई लढावी, आपल्या माणसांना लढू द्यावी. आपला आयुष्याचा प्रवास एकटा कुठं असतं, आपले अनेक जोडीदार असतात. त्यामुळे स्वत:ला एकाकी करू नका, मीच लढेन म्हणून नका, लढा, संघर्ष करा, पण त्यात आपल्या माणसांनाही सहभागी करून घेतलं तर जिंकण्याच्या शक्यता वाढतातच. त्या वाढल्या पाहिजेत.’
स्टुअर्ट स्कॉट यांचं हे भाषण ऐकून जमलेली माणसं अक्षरश: रडली. पण प्रत्येकाला एक गोष्ट कळून चुकली होती, की चिकाटी सोडायची नाही म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरणच आज आपल्याला भेटलंय.!
- चिन्मय लेले