शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

टी २० विश्वचषकातून युवराज आऊट, मनिष पांडे इन

By admin | Updated: March 30, 2016 16:12 IST

अष्टपैलू सिक्सर किंग युवराज दुखापतीमुळे टी २० विष्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडेची संघात निवड करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - वेस्टइंडिज विरुद्ध होणाऱ्या उपांत्य सामन्यापुर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू सिक्सर किंग युवराज दुखापतीमुळे टी २० विष्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडेची संघात निवड करण्यात आली आहे. शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्द खेळताना त्याला झखम झाली होती. 
युवराजच्या जागी  अजिंक्य रहाणे किंवा पांडेला संधी मिळण्याची शक्यता आहे. ट्वेंटी-२0 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुध्द रविवारी झालेल्या सामन्यात युवराज सिंग धाव घेताना जखमी झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पोहचल्यानंतर लगेचच एमआरआय स्कॅनिंग करुन घेतले आहे. त्याची दुखापत जास्त असल्यामुळे बीसीसीआयने युवराजच्या जागी मनिष पांड्येची निवड केली आहे. 
मात्र, संपूर्ण स्पर्धेत राखीव बेंचवर बसलेल्या रहाणेचे पारडे जड आहे.
दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार कप्तान महेंद्रसिंह धोनी युवराजच्या जागी पवन नेगीचा समावेश करण्याला पसंती दिली आहे. मात्र रवी शास्त्री अजिंक्य रहाणेला खेळवू इच्छित आहेत. युवराज सिंगला दुखापत झाल्यानंतर  भारतीय संघ व्यवस्थापनाने मनीष पांडेला बोलावल्यामुळे त्यालाच खेळवलं जाईल अशी माहिती मिळीली होती. विराट कोहलीनेदेखील मनीष पांडेलाच पसंती दिल्याचं कळत आहे. 
सुरु असलेल्या या वादामुळे नेमकं कोणाला खेळवलं जाईल ? याबाबत अजूनही अनिश्चितता असल्याचं दिसून येतं आहे. गुरुवारी 31 मार्चला वानखेडे मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सेमी फायनल सामना होणार आहे.