शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

युकी-रोसोल, सोमदेव-वेस्ली लढत

By admin | Updated: September 18, 2015 00:07 IST

भारताचा अव्वल खेळाडू युकी भांबरी हा शुक्रवारपासून आर. के. खन्ना स्टेडियममध्ये चेक प्रजासत्ताकाविरुद्ध सुरू होणाऱ्या डेव्हिस चषक ‘विश्व ग्रुप प्ले आॅफ’ टेनिस लढतीच्या

नवी दिल्ली : भारताचा अव्वल खेळाडू युकी भांबरी हा शुक्रवारपासून आर. के. खन्ना स्टेडियममध्ये चेक प्रजासत्ताकाविरुद्ध सुरू होणाऱ्या डेव्हिस चषक ‘विश्व ग्रुप प्ले आॅफ’ टेनिस लढतीच्या पहिल्या सामन्यात लुकास रोसोलविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याची सोडत गुरुवारी जाहीर झाली. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, अ. भा. टेनिस संघटनेचे अध्यक्ष अनिल खन्ना आणि दोन्ही संघांतील खेळाडूंची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी विश्व क्रमवारीत १२५ व्या स्थानावर असलेला युकी ८५ व्या रँकिंगवरील रोसोलविरुद्ध खेळेल. दुसऱ्या सामन्यात सोमदेव देवबर्मन याला प्रतिस्पर्धी देशाचा अव्वल खेळाडू आणि विश्व क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेला जिरी वेस्ली याच्याविरुद्ध दोन हात करावे लागणार आहे. शनिवारी दुहेरीत लिएंडर पेस-रोहन बोपण्णा या भारतीय जोडीला अ‍ॅडम पाब्लासेक- राडेक स्टेपनेक यांच्याविरुद्ध लढत द्यायची आहे. रविवारी परतीच्या एकेरीत युकीची गाठ वेस्लीविरुद्ध आणि सोमदेवची गाठ रोसोलविरुद्ध पडेल. ही लढत जिंकणारा संघ पुढील वर्षी १६ संघांचा समावेश असलेल्या एलिट विश्व गटासाठी पात्र ठरणार आहे. पराभूत संघ पुन्हा आपल्या गटात परत जाईल. (वृत्तसंस्था)चेकचे पारडे जड!भारत-चेक यांच्यात आतापर्यंतची ही चौथी लढत असेल. याआधी भारताने सर्व तिन्ही लढती गमावल्या. तीन वेळेचा चॅम्पियन आणि जगातील अव्वल संघ असलेल्या चेक संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघदेखील घरच्या कोर्टवर सनसनाटी विजय नोंदविण्यास उत्सुक दिसतो.ड्रॉ आमच्या अनुकूल आहे, याचा लाभ घ्यावा लागेल. युकी पहिला आणि सोमदेव दुसरा सामना खेळणार आहे. दोन्ही लढतींचा निकाल आल्यावर स्थिती स्पष्ट होईल. दुहेरीत पेस-बोपण्णाची उपस्थिती आमच्यासाठी बोनस असेल. परतीच्या एकेरीतील निकालावर संपूर्ण लढतीचे चित्र विसंबून असेल.- आनंद अमृतराज, भारतीय कर्णधार