शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

पेसची माघार हा मोठा मुद्दा नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:18 AM

आशियाई स्पर्धेच्या पुरुष दुहेरी स्पर्धेपूर्वी लिएंडर पेसने अचानक माघार घेतली होती. मात्र भारताचा डेव्हिस चषकाचा कर्णधार महेश भूपतीच्या मते ही मोठी बाब नव्हती.

नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेच्या पुरुष दुहेरी स्पर्धेपूर्वी लिएंडर पेसने अचानक माघार घेतली होती. मात्र भारताचा डेव्हिस चषकाचा कर्णधार महेश भूपतीच्या मते ही मोठी बाब नव्हती.तो म्हणाला, ‘दुखापत ही खेळाडूच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. दुखापतीसह मैदानात उतरून त्यानंतर मैदानाबाहेर येण्यापेक्षा सामन्यापूर्वीच माघार घेणे कधीही चांगले असे मला वाटते.’ आशियाई स्पर्धेपूर्वी पेस अमेरिकेतील स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने आशियाई स्पर्धेतून आपण माघार घेत असल्याचे कळवले होते.पेसच्या माघारीमुळे आशियाई स्पर्धेतील आपल्या अभियानाला काही फरक पडला नसल्याचे स्पष्ट करीत भूपतीने पुरुष दुहेरीत भारताने सुवर्णपदक जिंकल्याचेही सांगितले. तो म्हणाला, ‘आशियाई स्पर्धेपूर्वी एका स्पर्धेत खेळताना पेसला दुखापत झाली आहे. इतकीच माहिती मला मिळाली होती. आमचे ध्येय सुवर्णपदक जिंकण्याचे होते आणि ते आम्ही साध्य केले.’तो म्हणाला, ‘कोणताही खेळाडू सामन्यादरम्यान दुखापतीमुळे बाहेर पडला तर मला आवडणार नाही. त्यापेक्षा दुखापतग्रस्त खेळाडूने सामन्यापूर्वीच माघार घेतलेली कधीही चांगली.’ या स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिविज शरण या जोडीने अंतिम सामन्यात अलेक्झांडर बुबलिक व डेनिस युवसेयेव या जोडीला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले होते.खेळाडूंच्या दुखापतीबाबत तो म्हणाला, ‘मी पाच डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान किमान दहा खेळाडू दुखापतग्रस्त झाले. युकी भांबरीने एक सामना खेळला. सुमित नागल सामन्यातून बाहेर पडला. एक खेळाडू असल्याने दुखापत ही खेळाडूच्या आयुष्याचा भाग असल्याचे मला माहीत आहे. डेव्हिस चषकाच्या बदलत्या स्वरुपात भारताला आता फेबु्रवारीत इटलीविरुद्ध लढावे लागणार आहे. भारताला या सामन्यात जिंकण्याची संधी असल्याचे भूपतीने सांगितले. तो म्हणाला, ‘आम्ही आमच्या देशातच खेळणार असल्याचा आम्हाला फायदा होणार आहे.’