शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीनुसार खेळ केल्याने मिळाला विजय - विनेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 06:46 IST

प्रशिक्षकाने मला वेगळेच डावपेच सुचविले होते. मॅटवर मी पुढे आलेल्या आव्हानांसाठी वेगळेच डावपेच अंमलात आणले होते, असे विनेशने सांगितले.

नीर सुल्तान (कझाखस्तान) : कुस्तीत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के करणारी पहिली भारतीय मल्ल होण्याचा मान मिळविणाऱ्या विनेश फोगाटने ऑलिम्पिक पात्रतेच्या महत्त्वपूर्ण लढतीत मॅटवर परिस्थितीनुरुप खेळ केल्यानेच विजय मिळाल्याचे म्हटले.

विश्व चॅम्पियनशिपच्या ऑलिम्पिक पात्रता कुस्तीआधी प्रशिक्षक वूलर एकोस यांनी विनेशला सारा एन हिल्टरब्रॅन्ड हिच्यापासून दूर राहण्याचा तसेच तिचा उजवा हात रोखणे आणि पाय पकडू न देण्याचा कानमंत्र दिला होता. विनेशने सामन्यातील परिस्थिती ओळखून याउलट केले. ५३ किलो गटात कांस्य जिंकण्यासह ऑलिम्पिक कोटा निश्चित केल्यानंतर दिलेल्या मुलखातीत सांगितले की प्रशिक्षकाने मला वेगळेच डावपेच सुचविले होते. मॅटवर मी पुढे आलेल्या आव्हानांसाठी वेगळेच डावपेच अंमलात आणले होते.

डावपेच अलगद लागू पडल्याचे सांगताना विनेश म्हणाली,‘ मी स्वत:वर दडपण आणत आहे, असा अनेकांचा समज झाला असावा. मी गुण गमवित नसल्याने प्रतिस्पर्धी खेळाडू थकताना जाणवली. पाय तावडीत देण्याच्या निमित्ताने मी खंबीर बचाव केला.माझ्या तुलनेत सारा बलाढ्य होती. तिने ताकद पणाला लावल्याचा लाभ घेत मी बाजी मारली.’

आई असती तर...मोठे पदक जिंकण्याचे महत्त्व काय असते, याची विनेशला जाणीव आहे. रिओ आॅलिम्पिक आधी झालेली दुखापत ती विसरु शकलेली नाही. यामुळे काही आठवडे व्हीलचेअरवर घालवावे लागले. माझ्या आईने माझी कुस्ती पाहणे बंद केले होते. मी पुन्हा जखमी होऊ शकते अशी तिला भीती वाटायची. तिने ही कुस्ती पाहिली असती, तर ओरडून ओरडून इतरांचे लक्ष वेधले असते. माझ्या मुलीचा पाय तोडू नका, अशी विनवणी केली असती.’ मल्ल असलेला पती सोमवीर राठी याच्याबाबत विनेश म्हणाली,‘ सोमवीरने भलेही पदके जिंकली नाहीत, पण कुस्तीतील डावपेचांमध्ये ते चाणाक्ष आहेत. विदेशी प्रशिक्षकासारख्या टीप्स त्यांच्याकडूनही मी घेत असते.’

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्ती