पदकाचे स्वप्न पूर्ण करणार : कश्यप

By Admin | Updated: September 15, 2014 02:23 IST2014-09-15T02:23:49+5:302014-09-15T02:23:49+5:30

आशियाई स्पर्धेत भारतासाठी पदक मिळविण्याचे माझे स्वप्न आहे़ राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविलेल्या सुवर्णपदकामुळे आत्मविश्वास उंचावला

Will fulfill medal dream: Kashyap | पदकाचे स्वप्न पूर्ण करणार : कश्यप

पदकाचे स्वप्न पूर्ण करणार : कश्यप

नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेत भारतासाठी पदक मिळविण्याचे माझे स्वप्न आहे़ राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविलेल्या सुवर्णपदकामुळे आत्मविश्वास उंचावला आहे़ याच बळावर मी दक्षिण कोरियातील स्पर्धेत पदक मिळवेन, असे मत भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू पी़ कश्यप याने व्यक्त केले आहे़
कश्यप म्हणाला, आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी गत तीन आठवड्यांपासून आपल्या खेळावर विशेष मेहनत घेतली आहे़ याच बळावर स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे़ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी तयारी झाली नव्हती़ त्यामुळेच स्पर्धेत विशेष कामगिरी करू शकलो नव्हतो; मात्र आशियाई स्पर्धेसाठी चांगली तयारी झाली आहे़ त्याचा परिणाम स्पर्धेत दिसेल, असेही त्याने सांगितले़
हा खेळाडू पुढे म्हणाला, दिवसेंदिवस कामगिरीचा स्तर उंचावण्यावर भर दिला आह़े सध्याच्या स्पर्धांमध्ये जो कुणी प्रतिस्पर्धी असेल त्यानुसार आपल्या खेळात बदल करावा लागतो़ आजकाल एकापाठोपाठ एक स्पर्धा होत असल्यामुळे आम्हाला काही नवे करण्याची संधी मिळत नाही़ यामुळे आम्ही खेळाडूंच्या सामन्यांचे व्हिडिओ बघून सामन्याची रणनीती ठरवितो़
कश्यपने सांगितले की, आशियाई स्पर्धेतील वैयक्तिक स्पर्धेचा ड्रॉ टीम चॅम्पियनशिपदरम्यान होणार आहे़ त्यामुळे एकेरीतील चुका सुधारण्यासाठी माझ्याकडे अजूनही वेळ आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Will fulfill medal dream: Kashyap