शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वीरधवल बेस्ट स्विमर

By admin | Updated: November 2, 2015 00:20 IST

येथे सुरु असलेल्या ६९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला बेस्ट स्विमरचा पुरस्कार देण्यात आला.

कोल्हापूर : येथे सुरु असलेल्या ६९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला बेस्ट स्विमरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह, एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळविले. महिलांच्या गटात गुजरातच्या मना पटेलला हा पुरस्कार देण्यात आला. पदकतालिकेत १४ सुवर्णपदकांसह रेल्वेचा संघ प्रथम स्थानावर राहिला. कर्नाटक दुसऱ्या, तर ८ सुवर्ण, ११ रौप्य आणि २९ कांस्यपदके मिळवणारा महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर राहिला. कर्नाटकला स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.शेवटच्या दिवशी महाराष्ट्राला एकूण सात पदके मिळाली. यात एक सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. सुवर्णपदकाचा मान ४ बाय ५0 मीटर फ्रीस्टाईल मिश्र रिले संघाने मिळवून दिला. या संघात विराज प्रभू, आदिती धुमाटकर, अवंतिका चव्हाण आणि वीरधवल खाडे यांचा समावेश होता.पुरुषांच्या ५0 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात शनिवारी सुवर्णपदक जिंकणाऱ्या वीरधवलला रविवारी १00 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वीरधवलने ५१.७५ अशी वेळ नोंदविली. या गटात रेल्वेच्या वरुण अ‍ॅरोनने ५१.२१ अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ८00 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या मोनिक गांधीने रौप्यपदक जिंकले. तिने ९:२४.७४ अशी वेळ नोंदविली. या गटात रायना सालडान्हा हिने ९:२९.१९ अशी वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले. कर्नाटकची मालविका व्ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. महिलांच्या ५0 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राला रौप्य आणि कांस्य अशी दोन पदके मिळाली. जोत्स्ना पानसरे ३१.३२ वेळेसह दुसऱ्या तर अवंतिका चव्हाण ३१.८९ अशा वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर राहीली. गुजरातची मना पटेल सुवर्णपदक विजेती ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)