सायप्रस - भारताच्या २४ वर्षीय आर. वैशालीने अखेरच्या फेरीत कॅटरिना लॅग्नोविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना अत्यंत अचूक आणि शानदार विजय नोंदवून अर्ध्या गुणाच्या फरकाने फिडे महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. या जोरावर आता ती वर्षाअखेरीस विश्वविजेपदासाठी चीनच्या जू वेनजुन हिला आव्हान देईल.
स्पर्धेच्या सुरुवातीला दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत कमी रेटिंग असलेली खेळाडू असूनही तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत धडक मारली. तिची ही कामगिरी २०२४ मधील डी. गुकेशच्या प्रवासासारखीच आहे. त्यानेही कमी रेटिंग असताना कँडिडेट्सचे विजेतेपद पटकावले होते. कारकिर्दीतील दुसऱ्या कँडिडेट्स स्पर्धेत खेळणारी वैशाली अंतिम फेरीत शांत व संयमी दिसली. खेळाची सुरुवात तिच्या योजनेनुसार झाली. एका प्याद्याच्या आघाडीसह वैशालीने दबाव कायम ठेवला. खेळातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ३८व्या, ३९व्या आणि ४०व्या चालीचा होता. यावेळी तिने काही निर्णायक चाली खेळल्या.
प्रज्ञानानंद, कार्तिकेय यांनी वाढवले मनोबल...वैशालीचा हा विजय अधिकच थक्क करणारा आहे. कारण, ती या स्पर्धेसाठी पात्रही ठरली नसती. गेल्या ऑगस्टमध्ये चेन्नई ग्रँड मास्टर्स स्पर्धेत तिला केवळ १.५ गुण मिळाले होते.या अपयशानंतर ती इतकी खचली होती की, तिने ग्रँड स्विस स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. तिचा भाऊ आर. प्रज्ञानानंद आणि जीएम कार्तिकेय मुरली यांनी तिचे मनोबल वाढवून तिला खेळायला लावले नसते, तर वैशालीने ग्रँड स्विस जिंकली नसती आणि कँडिडेट्ससाठी पात्रही ठरली नसती.
Web Summary : R. Vaishali won the FIDE Women's Candidates Tournament, defeating Kateryna Lagno. She will challenge Ju Wenjun for the world title, a feat made possible by her brother R. Praggnanandhaa and GM Karthikeyan Murali's support after a prior setback.
Web Summary : आर. वैशाली ने कैटरीना लैग्नो को हराकर फिडे महिला कैंडिडेट्स टूर्नामेंट जीता। वह विश्व खिताब के लिए जू वेनजुन को चुनौती देंगी, यह उपलब्धि उनके भाई आर. प्रज्ञानानंद और जीएम कार्तिकेयन मुरली के समर्थन से संभव हुई।