शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या सुप्रिया पाटीलने लक्ष वेधले

By admin | Updated: January 19, 2015 03:54 IST

मुंबई मॅरेथॉन महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उरणच्या २३ वर्षीय सुप्रिया पाटीलने.

मुंबई : मुंबई मॅरेथॉन महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उरणच्या २३ वर्षीय सुप्रिया पाटीलने. केगाव या छोट्या गावातील सुप्रियाने यंदाच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत १:२६:४८ सेकंद अशी वेळ देत कांस्यपदक मिळवले. प्रथम व द्वितीय क्रमांकावरील धावपटूंच्या तुलनेत सुप्रिया पिछाडीवर असली, तरी अनवाणी पायाने धावण्याची सवय असून, या स्पर्धेत ती बूट घालून धावल्याने तिच्या कामगिरीवर परिणाम झाला. ती अनवाणी धावली असती तर नक्कीच तिने कविता राऊतसमोर कडवे आव्हान उभे केले असते, असा विश्वास तिचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी व्यक्त केला.शालेय स्तरापासून ते जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत सुप्रियाने अनवाणी पायाने धावताना आपली छाप पाडली. दखल घेण्याची बाब म्हणजे गावात सरावायोग्य मैदान नसताना शेतातील गवत काढून त्याला अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकचे रूप देत सुप्रिया व तिचे सहकारी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सराव करतात. सुप्रियाला आगामी राष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागले आहेत. नुकताच ४ जानेवारीला पार पडलेल्या अहमदाबाद अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत देखील सुप्रियाने अनवाणी पायाने धावताना १:२१:०० अशी शानदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच गतस्पर्धेत सुप्रियाने ४२ किमी अंतराच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेताना ९वे स्थान मिळवले होते. (क्रीडा प्रतिनिधी)