शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: ‘त्या’ म्हणतात, ‘पैसा’ नको, ‘प्रेशर’ही नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 06:00 IST

Tokyo Olympics Update: मोठ्या कंपन्या बऱ्याचदा खेळाडूंवर परफॉर्मन्सची सक्ती करतात. वर्षात किमान इतक्या मॅचेस  खेळल्याच पाहिजेत, त्यात किमान इतकी पदकं मिळवलीच पाहिजेत, यासाठी खेळाडूंवर प्रचंड प्रमाणात दबाव आणला जातो. स्त्री खेळाडूंनी मूल जन्माला घालू नये यासाठी त्यांच्यावर बळजबरी केली जाते.

विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल... यासारख्या दिग्गज खेळाडूंना एका जाहिरातीचे किती पैसे मिळतात? प्रायोजक त्यासाठी किती पैसा ओततात आणि खेळाडूंना किती मालामाल करतात? जगभरातील मोठ्या कंपन्या दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी आपला ‘ब्रॅण्ड ॲम्बेसेडर’ म्हणून अक्षरश: लक्षावधी, कोट्यवधी रुपये ओततात.. त्याबद्दल सगळ्यांना या खेळाडूंचा हेवा वाटतो, पण या कंपन्या काय गंमत म्हणून त्यांच्यावर एवढा पैसा खर्च करतात? त्याबदल्यात त्यांना ‘रिझल्ट’ही हवा असतो. खेळाडूंनी मॅचेस जिंकल्याच पाहिजेत, ते कायम चर्चेत असलेच पाहिजेत, अशी अलिखित (काही वेळा अगदी लिखितही) सक्तीदेखील असते. खेळाडूंना आपल्या कामगिरीपेक्षा आपली कामगिरी कशी होईल याचीच धास्ती त्यामुळे जास्त असते. अनेक महिला ॲथलिट‌्सनी आता याविरुद्ध आवाज उठवताना, या कंपन्यांना रामरामही ठोकायला सुरुवात केली आहे. ‘तुमचा पैसा नको आणि तुमचं ‘प्रेशर’ही नको, म्हणून मोठ्या कंपन्यांशी जोडलं जाण्यापेक्षा लहान कंपन्यांना पसंती देणं सुरू केलं आहे.
मोठ्या कंपन्या बऱ्याचदा खेळाडूंवर परफॉर्मन्सची सक्ती करतात. वर्षात किमान इतक्या मॅचेस  खेळल्याच पाहिजेत, त्यात किमान इतकी पदकं मिळवलीच पाहिजेत, यासाठी खेळाडूंवर प्रचंड प्रमाणात दबाव आणला जातो. स्त्री खेळाडूंनी मूल जन्माला घालू नये यासाठी त्यांच्यावर बळजबरी केली जाते. खेळाडूंची कामगिरी चांगली झाली नाही किंवा त्या गर्भवती झाल्या तर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं जातं किंवा त्यांचे पैसेही कमी केले जातात. हेच खेळाडूंना आता नकोसं झालं आहे.
अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स सध्या बरीच चर्चेत आहे. मानसिक कारणावरून यंदाच्या ऑलिम्पिकमधून ऐनवेळी तिनं माघार घेतली. तिचं म्हणणं अनेकांनी उचलून धरलं, पण मुख्य म्हणजे तिला प्रायोजित करणाऱ्या ‘ॲथलिटा’नं लगोलग जाहीर केलं, “आम्ही सिमोनच्या भावनांचा आणि निर्णयाचा आदर करतो. ती स्पर्धेत भाग घेणार नसली, तरीही आम्ही कुठल्याही प्रकारे तिचं मानधन किंवा इतर सुविधा कमी करणार नाही!” 
‘गॅप इन्कॉर्पोरेशन’ ही तुलनेनं तशी छोटी कंपनी. ‘ॲथलिटा’ या ब्रॅण्डनेमनं महिला आणि मुलींसाठी विविध कपडे बनविले जातात. काही दिवसांपूर्वीच सिमोननं एका बड्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करून या कंपनीला पसंती दिली होती. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
२०१६च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतलेल्या अलेक्सी पापाज या धावपटूनं एका मोठ्या कंपनीबरोबरचा करार रद्द करून ‘चॅम्पियन’ या कंपनीबरोबर संबंध जोडले. 
मेरी केन या धावपटूनंही बड्या कंपनीला रामराम ठोकून बोस्टनमधील ‘ट्रॅकस्मिथ’ या छोट्या कंपनीला पसंती दिली. मेरी सांगते, “या कंपनीच्या ‘कोच’नं वजन कमी करण्यासाठी माझ्यामागे इतका लकडा लावला की त्यामुळे मी अक्षरश: अशक्त आणि कमजोर झाले!” 
ऑलिम्पिक स्पिंटर ॲलिसन फेलिक्सनंही आपली आधीची कंपनी सोडून ‘ॲथलिटा’ या ब्रॅण्डला जवळ केलं. आता ‘सेश’ या नावानं तिनं स्वत:चाच नवा ब्रॅण्ड सुरू केला आहे. फेलिक्सनं तर मोठ्या कंपन्यांच्या धोरणांवर जाहीर हल्ला चढवला होता. स्पर्धा हरल्यावर खेळाडूंना अपमानित वाटेल अशी वागणूक देणं, महिला ॲथलिट‌्सनी मुलांना जन्म देण्यापासून त्यांना रोखणं.. कंपन्यांच्या अशा अरेरावी वागणुकीला फेलिक्सनं जाहीर विरोध केला होता. त्याबद्दल त्यांच्यावर कडक ताशेरेही ओढले होते. चाहत्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी आणि खेळाडूंनीही फेलिक्सचं हे म्हणणं उचलून धरलं होतं. त्यामुळे एका बड्या कंपनीनं आपल्या धोरणांत नुकताच बदलही केला आहे.
स्टिपल चेसर (अडथळ्यांच्या शर्यतीतील ॲथलिट) कॉलीन क्विगली हिनंदेखील मोठ्या कंपनीच्या मनमानीला कंटाळून ‘लुलुलेमन’ या छोट्या कंपनीचा हात धरला! 
‘लुलुलेमन’ या कंपनीच्या मुख्य ब्रॅण्ड अधिकारी निक्की न्यूबर्गर म्हणतात, “मोठ्या कंपन्या खेळाडूंवर नेहमीच दबाव टाकतात. त्यामुळे खेळाडूंची कामगिरी कशी सुधारणार?”  असा हा प्रेशर-पैशाचा ‘खेळ’, तो कोण थांबवणार? 

‘नुसती प्रसिद्धी काय कामाची?’ 
अनेक महिला ॲथलिट‌्सचं म्हणणं आहे, आम्ही छोट्या ब्रॅण्ड‌्सना आता पसंती देतोय याचं कारण, त्यांची आणि बड्या कंपन्यांची मानसिकता, वागणूक यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. छोट्या कंपन्या  समानतेची आणि सन्मानाची वागणूक देतात. त्यांच्या नव्या उत्पादनांशी आम्हाला जोडून घेतात आणि एक व्यवसायापेक्षाही एक ‘घरगुती नातं’ तयार करतात. परफॉर्मन्सऐवजी आमच्या ‘पर्सनल स्टोरी’वर आणि आमच्या सोशल मीडिया ॲपिअरन्सकडे ते जास्त लक्ष देतात. ॲथलेटिक्सच्या मैदानात सध्या नाइके आणि आदिदास या मोठ्या ‘खेळाडू’ कंपन्या आहेत. त्यांचं मार्केटिंग जबरदस्त असतं, त्यामुळे खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतात; पण त्यांच्या करिअरसाठी ते नुकसानीचंही ठरू शकतं.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021