शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तगड्या न्यूझीलंडला बांगलादेशाने झुंजविले

By admin | Updated: March 14, 2015 01:08 IST

सलामीवीर मार्टिन गुप्तिलच्या (१०५ धावा) शतकानंतरही न्यूझीलंडला विश्वचषकाच्या ‘अ’ गटात अखेरच्या साखळी लढतीत शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध

हमिल्टन : सलामीवीर मार्टिन गुप्तिलच्या (१०५ धावा) शतकानंतरही न्यूझीलंडला विश्वचषकाच्या ‘अ’ गटात अखेरच्या साखळी लढतीत शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध विजयासाठी अक्षरश: संघर्ष करावा लागला. सात चेंडू आणि तीन गड्यांनी सरशी साधण्यासाठी यजमान संघाने बराच घाम गाळला. बांगलादेशने ५० षटकांत ७ बाद २८८ धावा उभारल्या. न्यूझीलंड संघाला हे लक्ष्य गाठण्यासाठी ४८.५ षटके खेळावी लागली. त्यांनी ७ बाद २९० धावा करीत सामना जिंकला. महम्मदुल्लाहच्या १२८ धावा आणि शाकिब अल हसनने ५५ धावांत घेतलेल्या चार बळींमुळे बांगलादेशने विजयाच्या दारात पाय ठेवला होता; पण काही चुका त्यांनाही नडल्या. न्यूझीलंडच्या सहाव्या विजयाचे हिरो गुप्तिल १०५ व रॉस टेलर ५६ हे ठरले. ही लढत अखेरपर्यंत रोमहर्षक बनली होती. डॅनियल व्हेट्टोरी नाबाद १६ आणि टिम साऊदी नाबाद १२ यांनी आठव्या गड्यासाठी नाबाद २१ धावांची भागीदारी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशकडून शाकिबच्या चार बळींशिवाय नासिर हुसेन याने ३२ धावांत दोन आणि रुबेल हुसेन याने ४० धावा देत एक गडी बाद केला.बांगलादेशकडून महम्मदुल्लाहने १२८, सौम्या सरकार ५१ आणि साबिर रहमान ४० यांनी उपयुक्त खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट, कोरी अ‍ॅण्डरसन आणि इलियट यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. कर्णधार शाकिब २३; तसेच मुशफिकूर रहीम १५ हे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर बाद झाले. सबीर रहमानने ४० धावांच्या खेळीत पाच चौकार व दोन षटकार खेचले. सबीर-महम्मदुल्लाह यांनी सहाव्या गड्यासाठी ७८ धावांची भागीदारीही केली. बांगलादेशचा अखेरचा गडी नासिर हुसेनच्या रूपात बाद झाला. त्याला ११ धावांवर इलियटने जाळ्यात अडकविले. मात्र, महम्मदुल्लाहने एक टोक सांभाळून धावसंख्येला आकार दिला. त्याने १२३ चेंडू टोलवित १२ चौकार व तीन षटकारांसह नाबाद १२८ धावांची दमदार खेळी केली.न्यूझीलंडचे दोन गडी ३३ धावांत बाद झाले होते. मॅक्यूलम ८ आणि केन विलियम्सन याने एक धाव केली. गुप्तिलने मात्र शंभर चेंडूंत ११ चौकार व दोन षटकारांसह १०५ धावा ठोकल्या. हे त्याचे सहावे वन डे शतक होते. टेलरने मंदगती फलंदाजीचा विक्रम नोंदवित ९७ चेंडूंत ५६ धावांचे योगदान दिले. गुप्तिल- टेलर यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३१ धावांची भागीदारी केली.