शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे तरी दबदबा असावा!

By admin | Updated: June 3, 2015 00:43 IST

अशी टीम बनायला हवी, जी विश्व क्रिकेटवर किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवेल. असा संघ पाहण्यास आपण उत्सुक आहोत,

नवी दिल्ली : अशी टीम बनायला हवी, जी विश्व क्रिकेटवर किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवेल. असा संघ पाहण्यास आपण उत्सुक आहोत, असे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी सांगितले. महेंद्रसिंग धोनीने जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’ केला होता. त्यानंतर विराट कोहलीकडे कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोपविण्यात आले. कर्णधार म्हणून आज तो प्रथमच बोलला. एका मुलाखतीत तो म्हणाला, आपण संघात मैत्रिपूर्ण वातावरणाची अपेक्षा करीत आहे. विश्व क्रिकेटवर भारतीय संघाने किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवावे, असे मला वाटते. तशा संघाची मी अपेक्षा करतो. आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. क्षमताही भरपूर आहे. प्रश्न फक्त योग्य ताळमेळाचा आहे. एवढेच नव्हे, तर आम्ही वर्षातून २५०-२८० दिवस सोबत राहतो. त्यामुळे संघात मैत्रिपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे आणि तसेच वातावरण तयार करण्याचा माझा प्रयत्न असेल. संघ हा शंका आणि असुरक्षिततेपासून मुक्त राहायला हवा. आॅस्ट्रेलिया संघ जेव्हा आपण खेळताना पाहतो तेव्हा तो संघ सर्व क्षेत्रात एकजुटीने खेळताना दिसतो आणि त्यामुळे या संघाविरुद्ध सर्वाेत्कृष्ट प्रदर्शनाची गरज असते. भारतीय संघाने सुद्धा अशीच कामगिरी करावी, असे मला वाटते. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विराटने ४ कसोटी सामन्यांत ६९२ धावा केल्या होत्या. या मालिकेबाबत तो म्हणाला, मला आठवतेय की, या मालिकेसाठी मी दोन महिन्यांपूर्वीच मानसिक तयारी केली होती. मला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे. आॅस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडायचे आहे आणि तेच झाले.सकारात्मक दृष्टिकोन असेल तर सर्वच शक्य आहे.(वृत्तसंस्था)