शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

‘दहा हजारी मनसबदार होण्याचे लक्ष्य होते’

By admin | Updated: June 1, 2016 03:35 IST

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडल्यामुळे चर्चेत असलेला इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने कारकिर्दीत १० हजार धावा फटकावण्याचे लक्ष्य होते आणि त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतो

डरहॅम : दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडल्यामुळे चर्चेत असलेला इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने कारकिर्दीत १० हजार धावा फटकावण्याचे लक्ष्य होते आणि त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात ९ गड्यांनी पराभव करीत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेणारा इंग्लंड संघाचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने सर्वांत लहान वयात कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठण्याचा पराक्रम केला. कुक म्हणाला,‘‘१० हजार धावांचा पल्ला गाठण्याचे लक्ष्य होते. गेल्या काही वर्षांपासून त्यासाठी प्रयत्नशील होतो. माझ्यासाठी ही विशेष बाब आहे. संघाच्या विजयामुळे आनंद झालाच, पण वैयक्तिक यशामुळेही सुखावलो. विजय मिळवणे आणि धावा फटकावणे या दोन्ही बाबी विशेष असतात. दहा हजार धावांचा पल्ला गाठण्याचा पराक्रम करताना माझे कुटुंबीय स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे माझ्यासाठी हा विशेष दिवस आहे.’’ इंग्लंडतर्फे १२८ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करणारा कुक पुढे म्हणाला, ‘‘सलामीवीर फलंदाजाला वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये खेळावे लागते आणि मी प्रदीर्घ कालावधीपासून संघासोबत जुळलेलो आहे. मी संघातील स्थान गमावलेले नाही. येथील खेळपट्टी आव्हानात्मक होती. अखेरच्या षटकांमध्ये खेळपट्टी पाटा वाटत होती. ही खेळपट्टी चेस्टर ली स्ट्रीटपेक्षा कोलंबोची भासत होती.’’(वृत्तसंस्था)