शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाच वर्ल्डकप पटकावू शकतो

By admin | Updated: March 9, 2016 05:11 IST

भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्व टी-२० स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधारांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्व टी-२० स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधारांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक व श्रीलंकेचा सनथ जयसूर्या यांच्यासह माजी दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वकप स्पर्धेत यजमान संघ बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला. या दिग्गज कर्णधारांव्यतिरिक्त माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग आणि जोगिंदर शर्मा व २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी जेतेपदासाठी भारताला पसंती दर्शवली आहे. या दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वकप स्पर्धेबाबत दिल्लीमध्ये आयोजित एक कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.सेहवागच्या मते यंदा भारताला विश्वकप पटकाविण्याची ९९ टक्के संधी आहे. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान १९ मार्च रोजी धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित लढतीबाबत बोलताना गांगुली म्हणाला, या लढतीत भारतीय संघ विजयाचा दावेदार राहील, तर काही प्रमुख खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर पाकिस्तान बाजी सरशी साधू शकतो, असे इंजमाम म्हणाला.शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मते भारतीय संघ सध्या शानदार फॉर्मात आहे. आशिया कप स्पर्धेत विजेतेपद पटकावताना भारतीय संघाने ते सिद्ध केले आहे. लक्ष्मण म्हणाला, ‘भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत असून, कामगिरीतही सातत्य राखले आहे. भारतीय संघात ‘मॅच विनर’ खेळाडू असून चांगले फिनिशरही आहेत. त्यामुळे उर्वरित संघाच्या तुलनेत भारतीय संघ मजबूत भासत आहे.’२००७ च्या विश्वकप स्पर्धेत विजयी चेंडू टाकणारा जोगिंदर शर्मा म्हणाला,‘भारतीय संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल. जेतेपद पटकावण्याचा आम्हाला आत्मविश्वास होता.(वृत्तसंस्था)