पुण्याची स्वाती गाढवे प्रथम

By Admin | Updated: May 16, 2016 02:31 IST2016-05-16T02:31:30+5:302016-05-16T02:31:30+5:30

मोसिनेट गेरेमेव आणि पेरेस जेपचिरचिर यांनी आज येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड १0 के शर्यतीत अव्वल स्थान मिळवले.

Swine Swine Donkeys in Pune | पुण्याची स्वाती गाढवे प्रथम

पुण्याची स्वाती गाढवे प्रथम

बंगळूरु : तीव्र उष्णता आणि दमट वातावरणावर मात करीत मोसिनेट गेरेमेव आणि पेरेस जेपचिरचिर यांनी आज येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड १0 के शर्यतीत अव्वल स्थान मिळवले. भारतीय महिलांच्या गटात पुण्याच्या स्वाती गाढवेने पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर नाशिकच्या संजिवनी यादवने हक्क गाजवला.
स्वातीने सुरवातीपासूनच आघाडी कायम ठेवत दहा कि.मी.चे अंतर ३४.४५ मिनिटात पूर्ण केले. संजिवनीने ३६.१३ मिनिटात ही शर्यत पूर्ण केली. ३७.१८ मिनिटात शर्यत पूर्ण करणारी मिनू तिसऱ्या क्रमांकावर राहीली.
८ किलोमीटरचे अंतर गेरेमेवने ८.३६ मिनिटात पार केले. ही शर्यत त्याने दुसऱ्यांदा जिंकली आहे. ट्रॅकच्या अंतिम लॅपपर्यंत गेरेमेव केनियाच्या जॉन लँगट आणि बोंसा डिडा यांच्या मागे पडला होता. परंतु निर्णायक क्षणी एका सेकंदाने दोघांना मागे टाकून गेरेमेवने २३ हजार डॉलर्स बक्षिसावर आपला हक्क सांगितला. शर्यतीनंतर गेरेमेव म्हणाला की, यंदा तापमान जास्त असल्याने ही शर्यत थोडी अवघड होती, पण गेल्यावर्षापासूनच ही शर्यत जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता. पुढच्यावर्षी मी पुन्हा येथे येईन.
विश्व हाफ मॅरेथॉन चॅम्पियन केनियाच्या जेपचिरचिरने ३२.१५ मिनिटात शर्यत जिंकली. तिने आपल्याच देशाच्या हेलाह किप्रोपपेक्षा १३ सेकंदाने सरस ठरली. ती म्हणाली, तापमान जास्त होते, पहिले तीन किलोमीटर हळू पळाल्याचे घड्याळ बघितल्यावर लक्षात आले त्यानंतर मी माझी गती वाढवली.
भारतीय पुरुष गटात पहिल्या आठ किलोमीटरपर्यंत गतचॅम्पियन सुरेश पटेल आघाडीवर होता. शेवटच्या एक किलोमीटरमध्ये लक्ष्मणनने जोर लावून फज्जा गाठला. त्याने ३0.३४ मिनिटाचा वेळ घेतला. आॅलिम्पिक क्चालिफायर नितेंद्रसिंह रावत तिसऱ्या स्थानावर राहीला.

Web Title: Swine Swine Donkeys in Pune