शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासनप्रकरणी सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

By admin | Updated: September 19, 2015 03:45 IST

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रमुख या नात्याने बोर्डाच्या आमसभेत सहभागी होऊ शकतात का, यावर निर्णय मागणाऱ्या बोर्डाच्या याचिकेची

नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रमुख या नात्याने बोर्डाच्या आमसभेत सहभागी होऊ शकतात का, यावर निर्णय मागणाऱ्या बोर्डाच्या याचिकेची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी तयारी दर्शविली.न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे ही याचिका सुनाणवीसाठी आली. या याचिकेवर सुनावणी केली जाईल पण तारीख निश्चित नसल्याचे पीठाने स्पष्ट केले. कायदेशीर स्पष्टीकरण मिळावे यासाठी याचिकेवर लवकर सुनावणी करण्याचा आग्रह बीसीसीआयकडून ज्येष्ठ विधिज्ञ के. के. वेणुगोपाल यांनी केला. श्रीनिवासन हे चेन्नई सुपरकिंग्जचे मालक या नात्याने हक्क सोडेपर्यंत बीसीसीआयची कुठलीही निवडणूक लढवू शकणार नाहीत, असा आदेश सुप्रीम कोर्टाने २२ जानेवारी रोजी दिला होता.या आदेशावर स्थिती स्पष्ट करण्याची विनंती बीसीसीआयने न्यायालयाला केली आहे. बीसीसीआयच्या आमसभेत सहभागी होण्याबाबत श्रीनिवासन यांच्या उपस्थितीस वैधानिक मान्यता स्पष्ट नसल्याचे बोर्डाचे मत असल्याने कोलकाता येथील आमसभेला श्रीनिवासन उपस्थित होताच आमसभा अनिश्चित काळासाठीलांबणीवर टाकण्यात आली होती. एक प्रशासक म्हणून आणि सीएसकेची मालकी असलेल्या इंडिया सिमेंटचे मालक या नात्याने कुठलीही दुहेरी भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी दिले होते. मी तामिळनाडू क्रिकेट संघटनेचा प्रमुख या नात्याने बैठकीत सहभागी होत असल्याचा युक्तिवाद करीत श्रीनिवासन यांनी त्या वेळी न्या. कृष्णा रॉय यांचा उल्लेख करीत बैठकीत सहभागी होऊ शकत असल्याचे सांगितले होते. (वृत्तसंस्था)