सुनील गावसकर, शास्त्री, श्रीकांत, गांगुलीने व्यावसायिक हित जोपासले

By Admin | Updated: December 18, 2014 05:15 IST2014-12-18T05:15:32+5:302014-12-18T05:15:32+5:30

बीसीसीआयमध्ये व्यावसायिक हित जोपासणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री, निवड समितीचे माजी

Sunil Gavaskar, Shastri, Shrikant, Ganguly have developed business interests | सुनील गावसकर, शास्त्री, श्रीकांत, गांगुलीने व्यावसायिक हित जोपासले

सुनील गावसकर, शास्त्री, श्रीकांत, गांगुलीने व्यावसायिक हित जोपासले

नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये व्यावसायिक हित जोपासणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री, निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यासह माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बीसीसीआयने बुधवारी काही
प्रशासक आणि संचालकांची यादी सादर केली.
अनेक आठवडे चाललेली मॅरेथॉन सुनावणी संपल्यानंतर कोर्टाने बीसीसीआयमध्ये पुनरागमनाचे वेध लागलेले एन. श्रीनिवासन यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास तसेच चेन्नई सुपरकिंग्सच्या खरेदीवरून उद्भवलेल्या दुटप्पी भूमिकेबाबतचा निर्णय राखून ठेवला. विशेष खंडपीठाने श्रीनवासन यांच्या बोर्डाचे प्रमुख
आणि सीएसकेचे मालक या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुनावणी करणारे न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. एफएमआय कलिफुल्ला यांच्या खंडपीठाच्या निर्देशानुसार आयपीएल तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये व्यावसायिक हितसंबंध असलेल्या संचालक आणि प्रशासकांची यादी आज बीसीसीआयने सादर केली. या यादीत उपरोक्त नावांसह लालचंद राजपूत यांचाही समावेश आहे. यादी वाचल्यानंतर न्यायालयाने ताशेरे ओढताना म्हटले की श्रीकांत राष्ट्रीय निवडकर्ते आहेत आणि हैदराबाद सनराईजर्सचे मेंटॉर देखील. हे कसे काय शक्य आहे? विशेष असे की भ्रष्टाचारप्रकरणी अस्थायी निलंबनानंतर श्रीनिवासन यांच्याऐवजी श्रीकांत हेच आयपीएल २०१४ चे संचालन करीत होते.
बीसीसीआयने २००८ साली आपल्या संविधानातील ६.२.४ या नियमांत दुरुस्ती केली. त्यानुसार बीसीसीआयचे अधिकारी आणि प्रशासकांना आयपीएल तसेच चॅम्पियन्स लीगमधील संघ खरेदी व प्रायोजकत्वाचे अधिकार बहाल करण्यात आले होते. याच वादग्रस्त संशोधनामुळे क्रिकेटमध्ये पैशाचा ओघ वाढलाच शिवाय अफरातफरीला पळवाटा फुटू लागल्याचे अनेक क्रिकेट प्रशासकांचे मत आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Sunil Gavaskar, Shastri, Shrikant, Ganguly have developed business interests