शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सरिताने देशाची लाज घालवली : मिल्खासिंग

By admin | Updated: January 17, 2015 02:58 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळवणाऱ्या भारतीय बॉक्सर सरिता देवी हिची महान अ‍ॅथलिट मिल्खासिंग यांनी मात्र निंदा केली

दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळवणाऱ्या भारतीय बॉक्सर सरिता देवी हिची महान अ‍ॅथलिट मिल्खासिंग यांनी मात्र निंदा केली आहे. इंचियोनयेथे पदकाचा स्वीकार करण्यास नकार देत तिने देशाची लाज घालविली, असे खळबळजनक उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले. ८६ वर्षीय मिल्खा सिंग म्हणाले, एखाद्या खेळाडूसाठी सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे देशाचा सन्मान. कोणत्याही परिस्थितीत देशाच्या प्रतिमेस धक्का पोहचता कामा नये, याची काळजी खेळाडूंनी घेतली पाहिजे. मात्र, सरिता देवीने याचा विचार केला नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य सामन्यात पराभूत घोषित केल्यानंतर तिने कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला होता. अशा वागणुकीमुळे तिच्यावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनने एका वर्षाची बंदी घातली. ही बाब भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी चांगली नाही. मला वाटते, सरिताला पंचांचा निर्णय मान्य नव्हता आणि त्यावर तिने नाराजी व्यक्त केली. असे असले तरी तिने पदक नाकारणे योग्य नव्हते. पदक वितरण समारंभात तिने जे काही केले त्यामुळे देशाची मात्र लाज गेली. मला नाही वाटत की तिने अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय मंचावर विरोध करायला हवा होता. सरितावर लादलेल्या बंदीच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी पुढे आला तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. गुरुवारी तिने सचिनची भेट घेत त्याचे आभार मानले. त्यानंतर सचिनने क्रीडा मंत्रालयास ‘आयबी’कडे भक्कमपणे बाजू मांडण्यास सांगितले. मिल्खा सिंग यांनी अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने ‘पद्मभूषण’ मागितल्याबद्दलही टीका केली.(वृत्तसंस्था)