स्पोर्ट: कृषी महाविद्यालयाचे क्रिकेटपटू विद्यापीठ संघात

By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:37+5:302014-11-22T23:30:37+5:30

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रिकेट संघ निवड चाचणीतून कृषी महाविद्यालय अकोल्याचे खेळाडू प्रतीक अरविंद साबळे आणि अक्षय बबनराव देशमुख यांची आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली.

Sport: Agricultural College Cricketers' Association | स्पोर्ट: कृषी महाविद्यालयाचे क्रिकेटपटू विद्यापीठ संघात

स्पोर्ट: कृषी महाविद्यालयाचे क्रिकेटपटू विद्यापीठ संघात

ोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रिकेट संघ निवड चाचणीतून कृषी महाविद्यालय अकोल्याचे खेळाडू प्रतीक अरविंद साबळे आणि अक्षय बबनराव देशमुख यांची आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली.
चाचणी १९ व २० नोव्हेंबर रोजी अमरावती कृषी महाविद्यालय येथे घेण्यात आली. निवड चाचणीमध्ये विदर्भातील १७ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. अक्षय हा अष्टपैलू खेळाडू असून, प्रतीक उत्कृष्ट फलंदाज आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा मध्य प्रदेशातील भोपाळ येथे होणार आहे. खेळाडूंना प्रा.डॉ.संदीप हाडोळे व सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.एस.माने यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटो:२३सीटीसीएल२८
२३सीटीसीएल२९
...

Web Title: Sport: Agricultural College Cricketers' Association