शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षांपूर्वी आजच सचिनने ठोकली वन-डेतील पहिली 'डबल सेंच्युरी'

By admin | Updated: February 24, 2016 13:53 IST

२४ फेब्रुवारी २०१० रोजी सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरोधात नाबाद 'डबल सेंच्युरी' (नाबाद २००) फटकावत नवा विक्रम रचला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - 'क्रिकेटचा देव' अशी ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन दशकांहून अधिक काळ सर्वोत्तम खेळ करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले. शतकांचे शतक, तसेच करीअरमध्ये सर्वात जास्त धावा ठोठावणारा क्रिकेटपटू यासह क्रिकेट जगतातील असंख्य रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. या असंख्य विक्रमांसह त्याचा आणखी एक अनोखा विक्रम म्हणजे ' वनडे' (एकदिवसीय) सामन्यात द्विशतक फटकावणारा सचिन हा जगातील पहिला खेळाडू आहे. आजच्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी २०१० रोजी सचिनने ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात २०० धावांची नाबाद खेळी करत एक नवा विक्रम नोंदवला होता. सचिनने १४७ चेडूंमध्ये २५ चौकार आणि ३ षटकारांसह ही अविस्मरणीय खेळी करत भारताला ४०१ धावांच्या डोंगर रचून दिला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला २४८ धावांमध्ये बाद करत हा सामना तब्बल १५३ धावांनी जिंकला आणि सचिनचे 'द्विशतक' सार्थ ठरवले.
एकदविसीय सामन्यात द्विशतक ठोकणार सचिन हा पहिलाच खेळाडू असून त्यानंतर भारताच्याच वीरेंद्र सेहवागने २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात २१९ धावा फटकावत सचिनचा रेकॉर्ड मोडला. आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये २०९ तर नोव्हेंबर २०१४ मध्ये २६४ धावांची खेळी करत रोहित शर्मानेही नवा विक्रम रचला. 
 
 
 वन-डेमध्ये द्विशतक झळकावणारे खेळाडू 
खेळाडूचे नाव धावसंख्या  तारीख विरोधी  संघ
सचिन तेंडुलकर नाबाद २०० २४ फेब्रुवारी २०१०दक्षिण आफ्रिका
वीरेंद्र सेहवाग२१९८ डिसेंबर २०११  
रोहित शर्मा २०९२ नोव्हेंबर २०१३ऑस्ट्रेलिया
रोहित शर्मा२६४ १४ नोव्हेंबर २०१४श्रीलंका
ख्रिस गेल२१५२४ फेब्रुवारी २०१५ झिम्व्बाब्वे
मार्टिन गुप्टिलनाबाद २३७२१ मार्च २०१५वेस्ट इंडिज