सौरव गांगुलीसोबतची पैज हरला शेन वॉर्न

By Admin | Updated: June 13, 2017 13:48 IST2017-06-13T13:48:52+5:302017-06-13T13:48:52+5:30

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसह पैज लावणं चांगलंच महागात पडलं आहे.

Shane Warne wins Sourav Ganguly | सौरव गांगुलीसोबतची पैज हरला शेन वॉर्न

सौरव गांगुलीसोबतची पैज हरला शेन वॉर्न

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसह पैज लावणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण शेन वॉर्न सौरव गांगुलीसोबतची पैज हरला आहे. स्वत: शेन वॉर्नने ट्विटरवर याची माहिती दिली.
 
सौरव गांगुली आणि शेन वॉर्नमध्ये आज तक या न्यूज चॅनलवरील एका कार्यक्रमात पैज लागली होती.चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान ‘करो या मरो’चा सामना झाला. या सामन्यात जर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर मी इंग्लंड संघाची जर्सी घालेन असं वॉर्न म्हणाला होता. म्हणजे ऑस्ट्रेलिया हरणार नाही याची वॉर्नला जवळपास खात्री होती, तरी त्याचं हे आव्हान गांगुलीने स्वीकारलं होतं. या सामन्यात डकवर्थ लुइस नियमानुसार इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 40 धावांनी पराभव केला, आणि वॉर्न पैज हरला.   
 
त्यानंतर 11 तारखेला शेन वॉर्नने पैज हारल्याचं ट्विट केलं. आपल्यातली पैज तू जिंकलास मित्रा, आता मला इंग्लंडचं टी-शर्ट शोधावं लागेल आणि ते मी दिवसभर घालेन असं ट्विट वॉर्नने केलं. 
 

Web Title: Shane Warne wins Sourav Ganguly