जोशना चिनप्पाचा सनसनाटी विजय

By Admin | Updated: November 1, 2015 03:00 IST2015-11-01T03:00:44+5:302015-11-01T03:00:44+5:30

जोशना चिनप्पाने कतार क्लासिक स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आज येथे सनसनाटी निर्णयाची नोंद करताना क्लासिक स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत

Sensational victory of Joshna Chinappa | जोशना चिनप्पाचा सनसनाटी विजय

जोशना चिनप्पाचा सनसनाटी विजय

दोहा : जोशना चिनप्पाने कतार क्लासिक स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आज येथे सनसनाटी निर्णयाची नोंद करताना क्लासिक स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन मिस्रच्या रनीम अल वलीलीचा पराभव केला.
भारताची राष्ट्रीय चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असणाऱ्या चिनप्पाने फक्त ३७ मिनिटांतच अव्वल मानांकित खेळाडूला ११-९, ११-६, ४-११, ११-९ असे नमवले.
दरम्यान, मिस्रची अन्य एक खेळाडू यतरेब अदेल हिने भारताच्या १३ व्या मानांकित दीपिका पल्लीकल हिला फक्त २६ मिनिटांतच ११-५, ११-७, ११-७ असे पराभूत केले. यतरेबची पुढील फेरीतील लढत चिनप्पाविरुद्ध होणार आहे.
चिनप्पाने दोन आठवड्यांआधीच डेलावेर इन्व्हेस्टमेंट यूएस ओपनमध्ये जागतिक क्रमवारीतील १० व्या मानांकित खेळाडू एनी एयू हिला सरळ गेममध्ये पराभूत केले होते.
तिने म्हटले, ‘‘माझ्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम विजय आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकनावर असणाऱ्या खेळाडूला पराभूत करणे यापेक्षा काय चांगले असू शकते.’’
पुरुष गटात सौरव घोषाल
उद्या आपल्या अभियानास सुरुवात करणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sensational victory of Joshna Chinappa