मुंबई : भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाबाबत एक धक्कादायक गोष्ट आता पुढे आली आहे. सानियाने पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकबरोबर लग्न केले आहे. पण या लग्नापूर्वी सानियाचे बॉलीवूडमधल्या एका अभिनेत्याबरोबर अफेअर असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या घरी एक पार्टी होती. या पार्टीमध्ये बॉलीवूडचे सेलिब्रेटी आले होते. या पार्टीचे आमंत्रण सानियालादेखील देण्यात आले होते. या पार्टीमध्ये सानिया आणि या अभिनेत्याची पहिल्यांदा ओळख झाली.

Image result for sania mirza with salman khan

पार्टीमधली ओळख पुढे वाढत गेली. सानिया आणि हा अभिनेता चांगले फ्रेंड्स झाले. या मैत्रीचे रुपांतर त्यानंतर प्रेमात झाले. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेटिंग करत होते. या दोघांमध्ये अफेअर असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. पण काही कालावधीनंतर त्यांचे ब्रेक अप झाल्याचेही वृत्त पसरले होते. हा बॉलीवूडचा अभिनेता होता शाहिद कपूर...

Web Title: Sania Mirza's 'Bollywood Actor Shahid Kapoor Affair' before her marriage to Shoaib Malik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.