शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंगमध्ये आता ‘रँकिंग’

By admin | Updated: January 9, 2015 01:32 IST

क्रिकेट, हॉकी, टेनिस व फुटबॉल या खेळांच्या लीग यशस्वी आणि लोकप्रिय ठरल्यामुळे नव्यानेच मान्यता मिळालेल्या बॉक्सिंग इंडियाने बॉक्सिंग लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : क्रिकेट, हॉकी, टेनिस व फुटबॉल या खेळांच्या लीग यशस्वी आणि लोकप्रिय ठरल्यामुळे नव्यानेच मान्यता मिळालेल्या बॉक्सिंग इंडियाने बॉक्सिंग लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बॉक्सिंगमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे उद्दिष्ट बाळगून या खेळाच्या विकासासाठी काही कठोर निर्णय घेण्याचे संकेतही दिले. देशांतर्गत स्पर्धेत रँकिंग पद्धत आणण्याचा निर्णय झाल्याने विविध कारणांनी स्पर्धेकडे पाठ फिरविणाऱ्या स्टारना रँकिंग गुण मिळविण्यासाठी खेळावेच लागेल.बॉक्सिंग इंडियाच्या यजमानपदाखाली नागपुरात गुरुवारपासून सुरू झालेल्या एलिट गटाच्या राष्ट्रीय पुरुष बॉक्सिंग स्पर्धेनिमित्त संदीप जाजोदिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संघटनेच्या कार्यकारिणीत काही ऐतिहासिक निर्णय झाले. यामध्ये बॉक्सिंगला व्यावसायिक लुक देण्यासाठी लीग सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने वर्ल्ड सिरीज सुरू केली. याच धर्तीवर भारतीय लीग असेल, अशी माहिती बॉक्सिंग इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘भारतीय बॉक्सिंगमध्ये आतापर्यंत कुठलीही रँकिंग पद्धत नव्हती. त्यामुळे झोनल आणि राष्ट्रीय स्पर्धेकडे स्टार बॉक्सर पाठ फिरवायचे; पण आता रँकिंग पद्धत आणण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे रँकिंगसाठी खेळावेच लागेल. फिटनेसशिवाय इतर कुठलेही कारण देत स्पर्धा टाळता येणार नाही. स्पर्धेत रँकिंग पद्धती असल्यामुळे नव्या दमाच्या उदयोन्मुख बॉक्सरना टॉप बॉक्सरविरुद्ध लढत देण्याची संधी उपलब्ध होईल. आमचा हेतू हाच आहे.’’देशात बॉक्सिंगची स्थिती फारशी चांगली नाही. प्रतिष्ठा आणि पैसा दोहोंची भर त्यात पडावी, हा हेतू डोळ्यांपुढे ठेवून आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे उपाध्यक्ष उदित सेठ म्हणाले.(क्रीडा प्रतिनिधी)आयओएची मान्यता मिळविण्याचे प्रयत्नबॉक्सिंग इंडियाला केंद्र शासनाने मान्यता दिली; पण भारतीय आॅलिम्पिक संघटनेने मान्यता देण्यास चक्क नकार दिला आहे. अशा वेळी केरळमध्ये आयोजित नॅशनल गेम्समध्ये बॉक्सिंगपटूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. यावर कवळी म्हणाले, ‘‘बॉक्सिंग इंडियाची आयओएसोबत मान्यतेसाठी झुंज सुरूच आहे. लवकरच यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.