शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League 2021-22: हाय व्होल्टेज पंगा! यूपी योद्धा, पुणेरी पलटण अन् जयपूर पिंक पँथर्सचा रोमांचक विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 23:02 IST

शेवटच्या काही सेकंदात तिन्ही सामन्यांचा निकाल फिरला. यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सला आणि पुण्याने तेलुगू टायटन्सला प्रत्येकी एका गुणाने तर जयपूर पिंक पँथर्सने हरयाणा स्टीलर्सला २ गुणांच्या फरकाने पराभूत केले.

Pro Kabaddi League 2021-22 Day 4 Live Updates : आज झालेले तीनही सामने प्रो कबड्डीच्या इतिहासातील रोमांचक सामन्यांपैकी एक ठरले. अगदी शेवटच्या सेकंदाला यूपी योद्धा आणि पुणेरी पलटणने अनुक्रमे  पाटणा पायरेट्स आणि तेलुगू टायटन्सला एका गुणाच्या फरकाने पराभूत केले. तर, जयपूर पिंक पँथर्सने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या आघाडीवर हरयाणा स्टीलर्सला धूळ चारली.

यूपी योद्धाने शेवटच्या सेकंदात जिंकला सामना (३६-३५)

पाटणा पायरेट्स आणि यूपी योद्धा दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत होते. सामना सुरू होताच दोन्ही संघांनी आक्रमण केले. त्यामुळे संपूर्ण सामन्यात गुणामधील अंतर खूपच कमी होते. शेवटच्या तीन सेकंदात तर हे अंतर केवळ एका गुणाचे होते. त्यावेळी दोन्ही संघांनी आपापल्या रेड्स उरकल्या. त्यामुळे शेवटची रेड करण्यासाठी यूपी योद्धाचा खेळाडू गेला. त्याला पाटणाच्या खेळाडूंनी पकडलं आणि एक गुण आपल्या नावे केला. पण त्याआधी त्याने बोनस लाईन टच केल्याने यूपी योद्धालाही १ गुण मिळाला. त्यामुळे अखेरीस एका गुणाच्या फरकाने यूपी योद्धाने बाजी मारली.

पुणेरी पलटणने तेलुगू टायटन्सला दिली मात (३४-३३)

पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसरा सामनादेखील अटीतटीचा झाला. पुणेरी पलटण आणि तेलुगू टायटन्स दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत होते. तेलुगू टायटन्सने जोर लावला आणि सुरूवातीला आघाडी घेतली. पण हाफ टाईमनंतर सामना हळूहळू पलटला. पुणेरी पलटणने एक रिव्ह्यू घेत सामन्यात रंगत वाढवली. अखेर सामन्याच्या शेवटच्या सेकंदात पुणेरी पलटणने एका गुणाने सामना जिंकला. तेलुगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईने १२ रेड पॉईंट्ससह सामन्यात सर्वाधिक १५ गुण मिळवले. पण पुणेरी पलटणच्या सांघिक कामगिरीपुढे टायटन्सचा निभाव लागला नाही.

जयपूरचा हरयाणावर रोमहर्षक विजय (४०-३८)

पहिल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी एका गुणाने विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही तसाच रोमांच पाहायला मिळाला. जयपूर पिंक पँथर्स संघाने अगदी शेवटच्या काही सेकंदांमध्ये आघाडी घेतली. आणि तीच दोन गुणांची आघाडी निर्णायक ठरली. हरयाणाकडून  विकासने ९ रेड पॉईंट्स आणि ५ बोनससह १४ गुणांची कमाई केली. पण जयपूरकडून ११ रेड पॉईंट्ससह एकूण १७ गुण  मिळवत अर्जून देशवालने संघाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीPuneri Paltanपुनेरी पल्टनUP Yoddhaयूपी योद्धा