Pro Kabaddi: Bengal's win over U Mumba | प्रो कबड्डी : बेंगालचा यू मुंबावर विजय
प्रो कबड्डी : बेंगालचा यू मुंबावर विजय

कोलकाता : प्रो कबड्डी लीग सामन्यात हरियाणा स्टीलर्स वि. जयपूर पिंक पँथर्स सामना ३२-३२ असा बरोबरीत सुटला. मध्यंतराला हरियाणाने १८-१४ असे वर्चस्व राखले होते. मात्र जयपूरने जबरदस्त पुनरागमन करत बरोबरी साधली. अन्य लढतीत बेंगाल वॉरियर्सने यू मुंबाला २९-२६ असे पराभूत केले.

यू मुंबाच्या संघाने यावेळी जोरदार आक्रमण केले, पण त्यांना चांगल्या पकडी करता आल्या नाहीत आणि सामना गमवावा लागला. यू मुंबाने चढायांमध्ये २० गुण पटकावले, तर बेंगालला १६ गुण मिळवता आले. पण पकडींमध्ये यू मुंबाने फक्त सहा गुण पटकावले, तर बेंगालला १० गुण मिळवता आले. त्याचबरोबर बेंगालच्या संघाने यू मुंबाला एक ऑल आऊट केले.


Web Title: Pro Kabaddi: Bengal's win over U Mumba
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.