शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी ‘पीपीपी’ मॉडेल उपयुक्त - विजय गोयल

By admin | Updated: May 18, 2017 00:24 IST

देशात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) हे मॉडेल उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास गोयल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) हे मॉडेल उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास गोयल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला, तसेच १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सहा स्टेडियम ३० मे पर्यंत सज्ज होतील, अशी माहितीही गोयल यांनी या वेळी दिली.केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आगामी १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सहा स्टेडियमचा पाहणी दौरा सुरू केला आहे. बुधवारी नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमची पाहणी केल्यानंतर, गोयल यांनी मुंबई येथील ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली.आगामी ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ‘फिफा’ स्पर्धेसाठी गोवा, नवी दिल्ली, कोलकाता येथील स्टेडियमचा आढावा घेण्यात आला आहे. नवी मुंबई येथील पाटील स्टेडियममधील तयारी समाधानकारक असून, उर्वरित कोची आणि गुवाहाटी येथील स्टेडियमला लवकरच भेट देणार आहे, असे गोयल यांनी सांगितले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी त्या दर्जाच्या सुविधा देणे गरजेचे आहे. सुविधा पुरवताना देशात क्रीडा संस्कृतीस पोषक वातावरण निर्मिती करणे महत्त्वाचे असते. परिणामी, सरकारसोबत नागरिकांनीदेखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशातील क्रीडा क्षेत्रातील विकास ‘पीपीपी’ मॉडेलनुसार होणार असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान मोदी यांनी ‘फिफा’ स्पर्धेत विशेष स्वारस्य आहे. क्रिकेटसह फुटबॉल, हॉकी अशा अन्य खेळांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकार विविध योजना राबवणार आहेत. आगामी २०२०, २०२४ आणि २०२८ आॅलिम्पिकसाठी दिग्गज प्रशिक्षकांची टास्क फोर्स योग्य प्रकारे काम करत आहे. नॅशनल स्पोटर््स टॅलेंट मोहिमेंतर्गत ८-१२ वर्षांखालील मुलांना क्रीडापटू म्हणून तयार करण्यात येणार आहे. या टॅलेंट मोहिमेंतर्गत गाव-खेड्यांमधील मुलांवर विशेष लक्ष देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘फिफा’ विश्वचषक तिकीट फक्त ४८ रुपये !बहुचर्चित ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेचा सर्वसामान्य प्रेक्षकांना आनंद घेता यावा, यासाठी अवघ्या ४८ रुपयांपासून तिकीट मिळणार आहे. शिवाय फुटबॉल चाहत्यांसाठी ‘फुटबॉल सेल्फी’सारखे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असे गोयल यांनी सांगितले.नागपूर येथे प्रादेशिक क्रीडा केंद्र महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण यांच्यासाठी नागपूर येथे प्रादेशिक क्रीडा केंद्र मंजूर करण्यात आले आहे. १४१ एकर जागेत हे अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त प्रादेशिक क्रीडा केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.क्रीडा संघटना, फेडरेशनसाठी नवी समितीदेशात क्रीडा संघटना आणि महासंघासाठी केंद्र सरकारच्या वतीने नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व खेळ संघटना आणि महासंघावर केंद्राची ही नवी समिती देखरेख ठेवणार आहे. संघटना आणि महासंघाच्या कर्तव्य आणि जबाबदारीत उणिवा आढळल्यास कारवाई करणार असून, क्रीडाविकासासाठी खेळाडूंसह नागरिकांना उत्तर देणे अनिवार्य आहे.कांदिवलीचे ‘साई’ आता केंद्राच्या कक्षेतकांदिवली येथील स्पोटर््स अ‍ॅथोरेटी आॅफ इंडिया (साई) हे केंद्र सरकारच्या कक्षेत येणार आहे. यासाठी लवकरच राज्य सरकारसोबत ‘एमओयू’ करणार आहे. त्यानंतर, तेथे क्रीडापटूंना उपयुक्त असे केंद्र उभे राहील, असे गोयल म्हणाले.‘सरावासाठी नवी मैदाने’फिफासाठी डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये चार चेंजिंग रुम उभारण्यात येत आहेत. संघांना सरावासाठी ३ नवी फुटबॉल मैदाने विकसित करण्यात येत आहेत.