शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाक फुस्स... भारत दुसऱ्यांदा हॉकीचा डॉन

By admin | Updated: October 31, 2016 06:13 IST

पुरुष हॉकी संघाने भारतीयांचा आनंद द्विगुणित करताना, पारंपरिक पाकिस्तानला लोळवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची दिवाळी भेट दिली.

कुआंटन : देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना भारताच्या पुरुष हॉकी संघाने भारतीयांचा आनंद द्विगुणित करताना, पारंपरिक पाकिस्तानला लोळवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची दिवाळी भेट दिली. अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-२ असा पराभव करून, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला.विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने साखळी फेरीतदेखील पाकिस्तानला 3-2 असेच नमवले होते.संभाव्य विजेता म्हणून स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने आपल्या लौकिकानुसार खेळताना दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली आहे. 2011 साली भारताने या स्पर्धेत  बाजी मारली होती. त्या वेळीही भारताने पाकचाच पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव केला होता. दुसरीकडे पाकिस्तान स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता, परंतु भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात वरचढ खेळ करताना पाकची हवा काढली. पाकने २०१२ आणि २०१३ साली स्पर्धेवर वर्चस्व राखले होते. २०१२ साली पाकिस्तानने भारतावर मात करून पहिल्यांदा जेतेपद पटकावले होते, तर २०१३ साली यजमान जपानला नमवून पाक संघ दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन बनला होता. बाप बाप होता है...क्रिकेटच्या मैदानात वीरेंद्र सेहवागने पाकच्या शोएब अख्तरला याच शब्दात डिवचले होते. आता हॉकी टीमने पाकला लोळवल्यानंतर सेहवागने टिष्ट्वटरवर याच शब्दात पुन्हा एकदा पाकिस्तानवर वार केला.