अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही

By Admin | Updated: October 12, 2015 23:49 IST2015-10-12T23:49:33+5:302015-10-12T23:49:33+5:30

महान खेळाडू पेले यांनी, फुटबॉल खेळाची सर्वोच्च संघटना फिफाचा प्रमुख बनण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Not a presidential race | अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही

अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही

कोलकाता : महान खेळाडू पेले यांनी, फुटबॉल खेळाची सर्वोच्च संघटना फिफाचा प्रमुख बनण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे. फिफा अजूनही भ्रष्टाचाराच्या आरोपाशी संघर्ष करीत आहे. त्यामुळे त्याचे अध्यक्ष सेप ब्लाटर आणि यूएफ प्रमुख मायकल प्लाटिनी यांना निलंबित करण्यात आले आहे.
पेले एका आठवड्याच्या भारतीय दौऱ्यावर आले आहेत. तीनदा वर्ल्डकप विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व करणारे पेले यांनी माझा फिफा अध्यक्ष बनण्याचा कोणताही इरादा नसल्याचे सांगितले.
या वर्षी फिफावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. फिफात मुळापर्यंत भ्रष्टाचार पोहोचला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने त्यांच्या काही शीर्ष पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी केली आहे आणि नंतर फिफाच्या नैतिक समितीने ब्लाटर व प्लाटिनी यांना निलंबित केले आहे.
पेले म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या पिढ्यांतील फुटबॉलपटूंची तुलना करणे कठीण असते; परंतु गेल्या दहा वर्षांत मेस्सी हा सर्वोत्तम आहे. रोनाल्डोदेखील पुढे येऊन गोल करण्याचा प्रयत्न करतो; परंतु मेस्सी वेगळ्या शैलीचा खेळाडू आहे. मी माझ्या संघात दोघांनाही ठेवले असते. नेमारचेदेखील भविष्य उज्ज्वल आहे.’’ या ७४ वर्षीय दिग्गजाने खेळात खूप स्पर्धा वाढल्याचे मान्य केले.
तथापि, आताही आपण खेळलो तर तेवढेच यशस्वी ठरलो असतो, असे स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)

Web Title: Not a presidential race