शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडची लंकेविरुद्ध ‘पकड’

By admin | Updated: December 13, 2015 02:28 IST

न्यूझीलंडने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरीस ३०८ धावांची भक्कम आघाडी घेऊन लंकेविरुद्ध पकड मिळविली आहे. न्यूझीलंडच्या ४७१ धावांच्या उत्तरात लंकेचा पहिला डाव

ड्युनेडिन : न्यूझीलंडने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरीस ३०८ धावांची भक्कम आघाडी घेऊन लंकेविरुद्ध पकड मिळविली आहे. न्यूझीलंडच्या ४७१ धावांच्या उत्तरात लंकेचा पहिला डाव २९४ धावांत आटोपला. १३७ धावांची आघाडी मिळविणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावात एक बाद १७१ अशी मजल गाठताच हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. आता केवळ पाऊसच न्यूझीलंडला विजयापासून दूर ठेवू शकेल.केन विल्यम्सनने वर्षभरात हजार धावांचा पल्ला गाठून ‘एलिट’ क्लबमध्ये सहभागी होण्याचा मान मिळविला. खेळ थांबला तेव्हा टॉम लेंथम ७२ आणि विल्यम्सन ४८ हे नाबाद होते. या दोघांनी आतापर्यंत दुसऱ्या गड्यासाठी ७९ धावांची भागीदारी केली. यंदा विल्यम्सनशिवाय अ‍ॅलिस्टर कुक, ज्यो रुट, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी एक हजार धावांचा टप्पा गाठला, हे विशेष. त्याआधी लंकेने ४ बाद १९७ वरून पुढे सुरुवात केली. दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर दिनेश चांदीमल (८३) बाद झाला. कितुविवान वितांग(२२), मिलिंद सिरीवर्धने (३५), रंगना हेरात (१५) यांनी बऱ्यापैकी योगदान दिले. टीम साऊदी आणि नील वेंगनर यांंनी न्यूझीलंडसाठी प्रत्येकी ३ गडी बाद केले. (वृत्तसंस्था) धावफलक : न्यूझीलंड : पहिला डाव सर्वबाद ४३१; श्रीलंका : पहिला डाव सर्वबाद २९४ - न्यूझीलंड : दुसरा डाव १७१/१; टॉम लॅथम ७२ नाबाद. मार्टिन गुप्टील ४६, केन विल्यमसन ४८ नाबाद, गोलंदाजी, रंगाना हेराथ १/३९.