शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सेहवागला अपशब्द वापरणा-या पाक माजी क्रिकेटपटूला मनोज तिवारीचं उत्तर

By admin | Updated: June 12, 2017 13:08 IST

टीम इंडिया आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजयापासून केवळ दोन पावलं दूर आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटने पराभव करून भारताने दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - टीम इंडिया आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजयापासून केवळ दोन पावलं दूर आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटने पराभव करून भारताने दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसरीकडे भारताकडून झालेल्या  लाजीरवाण्या पराभवातून पाकिस्तान अजूनही सावरलेला दिसत नाही. पाकिस्तानचा माजी विकेटकीपर राशिद लतीफ यांनी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसाठी अपशब्द वापरले आहेत. तर लतीफ यांना भारताचा युवा क्रिकेटपटू मनोज तिवारीने  सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
 
पाकिस्तानवर 124 धावांच्या विजयानंतर  वीरेंद्र सेहवागने नातवानंतर मुलगा. काही हरकत नाही मुलांनो, चांगले खेळलात. भारताचं अभिनंदन असं ट्विट केलं होतं. सेहवागच्या या ट्विटमुळे पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी सेहवागच्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली. श्रीलंकेकडून भारताचा पराभव झाल्यानंतर सेहवागला प्रत्युत्तर म्हणून लतीफने एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्याने सेहवागबाबत अपशब्दांचा वापर केला होता. 
 
यानंतर मनोज तिवारीने व्हिडीओद्वारे राशिद लतीफ यांना उत्तर दिलं आहे. मी व्हिडीओ मेसेज कधी अपलोड करत नाही, पण आज एक व्हिडीओ पाहून राहावलं नाही, राशीद लतीफ 60 सेकंदांच्या स्वस्त लोकप्रियतेसाठी सेहवागबाबत अशा शब्दांचा वापर करत आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. सेहवागचे विक्रम इंग्लिशमध्ये आहेत, त्यामुळे राशिद लतीफ यांना कोणीतरी अनुवाद करुन समजावलं पाहिजे. तुम्ही ज्या सेहवागबद्दल बोलताय, त्याच्या जवळही पोहोचू शकत नाही. तुमच्या ज्या मित्राला इंग्लिश समजतं त्याला सांगा की, मला सेहवागचा विक्रम हिंदीत अनुवाद करुन समजावं.”‘हा व्हिडीओ मेसेज एका मुर्खासाठी आहे, ज्याचं नाव राशिद लतीफ आहे. तुम्ही अतिशय बेशरम व्यक्ती आहात. तोंड पाहिलंय का तुमचं? तोंड काळं करुन फिरताय. तुम्हाला लाज-शरम नाही. जे दोन-चार खेळाडू तुम्हाला पाहून, तुमची विकेटकीपिंग पाहून शिकतात, ते लक्षात घेऊन तरी यापुढे अशाप्रकारचा व्हिडीओ रेकॉर्ड करु नका. हा व्हिडीओ पाहून तुमची चपलेने धुलाई करायला हवी. असा व्हिडीओ शेअर करताना  यापुढे शब्दांचा वापरता करताना काळजी घ्या, असा इशाराही तिवारीने दिला आहे.
पाहा व्हिडीओ-