शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लंका दोनशे धावांत गारद

By admin | Updated: October 23, 2015 01:36 IST

सोबर्स-टिसेरा चषक कसोटी सामन्यांत पहिल्या दिवशी वेस्टइंडिजने श्रीलंकेला अवघ्या दोनशे धावांत गुंडाळले. जोमेल वारिकन याने ४ गडी तंबूत धाडत लंकेच्या फलंदाजीचे

कोलंबो : सोबर्स-टिसेरा चषक कसोटी सामन्यांत पहिल्या दिवशी वेस्टइंडिजने श्रीलंकेला अवघ्या दोनशे धावांत गुंडाळले. जोमेल वारिकन याने ४ गडी तंबूत धाडत लंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. जॅसन होल्डर व जेरॉम टेलर यांनी प्रत्येकी २ बळी घेत जोमेलला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा वेस्टइंडिजने १ गडी गमावून १७ धावा केल्या होत्या. कोलंबो येथील पी. सारा ओव्हल मैदानावर गुरूवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव ६६ षटकांत २०० धावांत संपुष्टात आला. जेरॉम टेलरच्या पहिल्याच षटकांत सलामीवर कौशल सिल्वा (०) रामदिनकडे झेल देऊन तंबूत परतला. पाठोपाठ दिमुथ करुणारत्ने (१३), कुशल मेंडिस (१३) दोन चेंडूंच्या अंतराने बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली. त्यानंतर आलेले दिनेश चंदीमल (२५), अँजेलो मॅथ्यूज (१४) ठरावीक अंतराने बाद झाल्याने नव्वदीतच निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मिलिंदा श्रीवर्धनाने (६८) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत गेले. रंगना हेराथ याने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद २६ धावांची खेळी करीत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. पहिल्या दिवसअखेर वेस्टइंडिजने ५.२ षटकांत १ बाद १७ धावा केल्या होत्या. शाई होप (४) याला प्रसादने पायचीत करीत तंबूत धाडले. क्रेग ब्राथवेट (४), देवेंद्र बिशू (५) धावांवर खेळत आहेत.संक्षिप्त धावफलक श्रीलंका पहिला डाव : ६६ षटकांत सर्वबाद २००, दिमुथ करूणारत्ने पायचीत गो. होल्डर १३, कौशल सिल्वा झे. रामदिन गो. टेलर ०, दिनेश चंदीमल त्रि.गो. टेलर २५, मिलिंदा श्रीवर्र्धना झे. टेलर गो. वारिकन ६८, रंगना हेराथ नाबाद २६, जेरॉम टेलर २/५०, केमार रोश १/३०, जॅसन होल्डर २/२२, जोमेल वारिकन ४/६७, देवेंद्र बिशू १/१८, वेस्ट इंडिज : ५.२ षटकांत १ बाद १७, क्रेग ब्राथवेट नाबाद ४, शाई होप पायचीत गो. प्रसाद ४, देवेंद्र बिशू नाबाद ५.