कृणालची झंझावती खेळी; मुंबईचे दिल्लीसमोर २०७ धावांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2016 22:12 IST2016-05-15T21:58:47+5:302016-05-15T22:12:20+5:30

कृणाल पांड्याच्या ८६ धावांच्या झंजावती खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीसमोर २०७ धावांचे आव्हान ठेवले आहे. कृणाल पांड्याने ३७ चेंडूत केलेल्या शानदार ८६ धावा मुंबईच्या इनिंगचं आकर्षण ठरलं

Krishnal ki Jhanjavati kheli; Challenge of 207 runs against Mumbai in Delhi | कृणालची झंझावती खेळी; मुंबईचे दिल्लीसमोर २०७ धावांचे आव्हान

कृणालची झंझावती खेळी; मुंबईचे दिल्लीसमोर २०७ धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ : कृणाल पांड्याच्या ८६ धावांच्या झंजावती खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीसमोर २०७ धावांचे आव्हान ठेवले आहे. कृणाल पांड्याने ३७ चेंडूत ६ षटकार आणि ७ चौकार लगावत केलेल्या शानदार ८६ धावा मुंबईच्या इनिंगचं आकर्षण ठरलं आहे. रोहित - गुप्टिलने ४६ धावांची सलामी दिली. रोहितने २१ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. गुप्टिलने संयमी फलंदाजी करताना ४२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. गुप्टिल आणि कृणाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. गुप्टिल, कृणाल बाद झाल्यानंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात पोलार्डही लगेच तंबूत परतला. शेवटच्या षटकात रायडूने ५ चेंडूत १३ तर बटलरने ९ चेंडूत १८ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २०० पार केली. मुंबईने निर्धारित २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २०६ धावांचा डोगंर उभा केला आहे.
दिल्लीतर्फे मॉरिसने २ फलंदाजांना बाद केले तर झहीर खान आणइ मिश्राने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. 

Web Title: Krishnal ki Jhanjavati kheli; Challenge of 207 runs against Mumbai in Delhi