शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरियाने भारताला रोखले

By admin | Updated: October 23, 2016 03:16 IST

अव्वल मानांकित भारतीय संघाला शनिवारी चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या रॉऊंड रॉबिन लढतीत दक्षिण कोरियाने १-१ असे बरोबरीत रोखले.

कुआंटन (मलेशिया) : अव्वल मानांकित भारतीय संघाला शनिवारी चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या रॉऊंड रॉबिन लढतीत दक्षिण कोरियाने १-१ असे बरोबरीत रोखले. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या भारतापुढे ११ व्या स्थानावर असलेल्या कोरियन संघाने आव्हान निर्माण केले. सामन्याच्या पहिल्या क्वार्टरला पिछाडवर पडल्यानंतर भारतीय गोलकिपर पी. आर. श्रीजेशने संघासाठी अनेक गोल बचावले. भारतीय खेळाडूने केलेल्या चुकीचा लाभ घेत जुआंग जून-वूने सामन्याच्या ११ व्या मिनिटाला कोरिया संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने बरोबरी साधण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण अखेर ३३ व्या मिनिटाला भारताला त्यात यश मिळाले. ललित उपाध्यायने कोरियाची बचाव फळी भेदत संघाला बरोबरी साधून दिली. जेतेपदाचा दावेदार मानल्या जात असलेल्या भारतीय संघाच्या खात्यावर दोन सामन्यातून चार गुणांची नोंद आहे. रविवारी भारताला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. दोन सामने खेळणाऱ्या दक्षिण कोरियाच्या खात्यावर एक गुण आहे. शुक्रवारी त्यांना पाकिस्ताविरुद्ध अखेरच्या मिनिटाला पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)उद्या महामुकाबला; भारत-पाक भिडणारआपल्या पहिल्या सामन्यात जपानचा १०-२ अशा मोठ्या फरकाने नमविणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला रविवारी पाकिस्तानचे आव्हान आहे. पाक संघाला नमविणे एवढे एकच आव्हान भारतीय संघापुढे असल्याने हा ‘महामुकाबला’ चांगलाच रंगणार, यात शंका नाही. भारताने या स्पर्धेत आपल्या अभियानाच्या प्रारंभीच जपान संघाला १०-२ अशा मोठ्या फरकाने नमविले. तर दुसरीकडे पाकिस्तानला यजमान मलेशिया संघाविरुद्ध २-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. इतिहासावर नजर टाकल्यास भारत चॅम्पियन्स चषक स्पर्धेत सन २०११ साली विजेता बनला होता. पाकिस्तान संघाला पराभूत करीत भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तर पाकिस्तान संघाने सन २०१२ साली भारताला पराभूत केले होते. शिवाय पाकिस्तानने २०१३ साली देखील या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जपानचा संघ या स्पर्धेत उपविजेता राहिला होता. त्यानंतर मात्र दोन वर्षे या स्पर्धा झाल्याच नाहीत.