उपांत्य सामन्यात कोहली फ्लॉप, ख्रिस गेल हिट दाऊद इब्राहिमची भविष्यवाणी

By Admin | Updated: March 31, 2016 17:40 IST2016-03-31T17:40:52+5:302016-03-31T17:40:52+5:30

भारत वेस्टइंडिजला हरवेल, अशी भविष्यवाणी दाऊदनं केली आहे, तसंच या मॅचमध्ये गेल चालेल असं दाऊदला वाटत असल्याच्या चर्चा सट्टाबाजारात आहेत

Kohli's flop, Chris Gayle hit Dawood Ibrahim's prediction in the semi-finals | उपांत्य सामन्यात कोहली फ्लॉप, ख्रिस गेल हिट दाऊद इब्राहिमची भविष्यवाणी

उपांत्य सामन्यात कोहली फ्लॉप, ख्रिस गेल हिट दाऊद इब्राहिमची भविष्यवाणी

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज संध्यकाळी टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामना होणार आहे. क्रिकेट रसिक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत, तर या मॅचसाठी सट्टाबाजरही तेजीत आहे.
 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनंही या मॅचआधी भविष्यवाणी केली आहे. या मॅचमध्ये भारत वेस्टइंडिजला हरवेल, अशी भविष्यवाणी दाऊदनं केली आहे, तसंच या मॅचमध्ये गेल चालेल असं दाऊदला वाटत असल्याच्या चर्चा सट्टाबाजारात आहेत. 
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या मॅचसाठी जवळपास अडीच हजार कोटींचा सट्टा लागला होता. पण या मॅचसाठी तब्बल चार हजार कोटींचा सट्टा लागला आहे. सट्टाबाजारामध्ये सध्या विराट कोहली दुसऱ्या तर ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहलीपेक्षा सट्टाबाजारामध्ये फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्मावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लागत आहे.

Web Title: Kohli's flop, Chris Gayle hit Dawood Ibrahim's prediction in the semi-finals