शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

किदांबी श्रीकांतने रचला इतिहास

By admin | Updated: March 16, 2015 02:23 IST

भारतीय युवा बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत याने आज पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात विक्टर एलेक्सन यास पराभूत करीत स्विस ओपन ग्रांप्री गोल्ड किताब

बासेल : भारतीय युवा बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत याने आज पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात विक्टर एलेक्सन यास पराभूत करीत स्विस ओपन ग्रांप्री गोल्ड किताब आपले नावे केला. हा किताब जिंकणारा तो प्रथम भारतीय खेळाडू ठरला आहे. जगातील चौथ्या नंबरचा खेळाडू श्रीकांत याने सहाव्या क्रमांकावरील डेन्मार्कच्या एलेक्सनचा २१-१५, १२-२१, २१-१४ अशा सेटने पराभव केला. हा सामना ४७ मिनिटे चालला. या विजयाने श्रीकांतला एक लाख वीस हजार डॉलरचे पारितोषिक मिळाले.चीन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर २०१४च्या फायनलमध्ये पाच वेळेस विश्व आणि दोनवेळा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लिन डैन याचा खळबळजनक पराभव करणाऱ्या श्रीकांतने दुसरा सेट गमविल्यानंतर पुनरागमन करून विजय मिळविला. स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी अत्यंत सतर्कतेने खेळ करण्यास सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये एकवेळ दोघांची ८-८ असेच बरोबरी असताना श्रीकांतने जोरदार आक्रमक करीत पहिला सेट आपल्या नावे केला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये एलेक्सनने श्रीकांतला कसलीच संधी न देता सुरुवातीपासून आगेकूच केली. अखेर त्याने दुसरा सेट २१-१२ने आपल्या नावे मिळविला. तिसरा सेट अतिशय रंगतदार झाला. सुरुवातीपासून दोघांचा ४-४, ९-९, १३-१३ असा बरोबरीवर खेळ सुरू होता. यानंतर श्रीकांतने सलग तीन अंक मिळवत चढाई केली. त्यानंतर एलेक्सनला केवळ एकच अंक मिळविता आला. त्यानंतर श्रीकांतने सलग तीन पाच अंक मिळवित सेट आपल्या नावे केला. (वृत्तसंस्था)