इशांत शर्माची विकेट पडली, बास्केटबॉल खेळाडूसोबत साखरपुडा

By Admin | Updated: June 20, 2016 10:35 IST2016-06-20T07:16:04+5:302016-06-20T10:35:44+5:30

भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्माचा बास्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंगबरोबर साखरपुडा झाला आहे

Ishant Sharma got his wicket, with a basketball player | इशांत शर्माची विकेट पडली, बास्केटबॉल खेळाडूसोबत साखरपुडा

इशांत शर्माची विकेट पडली, बास्केटबॉल खेळाडूसोबत साखरपुडा

 
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 20 - भारतीय क्रिकेट संघ मैदानावर फॉर्ममध्ये असला तरी मैदानावाबेर मात्र सर्व क्रिकेटपटूंच्या विकेट पटू लागल्या आहेत. युवराज सिंग, सुरैश रैना, रवींद्र जाडेजा आणि रोहित शर्मानंतर आता फास्ट बॉलर इशात शर्मादेखील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रविवारी इशांत शर्माचा प्रतिमा सिंगबरोबर साखरपुडा झाला आहे. प्रतिमा सिंग ही बास्केटबॉल खेळाडू आहे.  
 
लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही. दोन्ही कुटुंब लग्नाची तारीख ठरवत आहेत. मात्र कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीच्या अखेरपर्यंत लग्न पार पडेल. साखरपुडा झाल्यानंतर रोहित शर्मानं इशांतला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाच रोहितनं आजच्या दिवशी तरी केस कापायचे असं म्हणत मस्करी केली आहे. 
 
इशांतची होणारी पत्नी प्रतिमा मूळची वाराणसीची आहे. तसंच भारतीय महिला राष्ट्रीय महिला बास्केटबॉल टीमची खेळाडू आहे. प्रतिमाला चार बहिणी आहेत. प्रशांती सिंह, दिव्या सिंह, प्रियंका सिंह, आकांक्षा सिंह अशी त्यांची नावे असून पाचही बहिणी बास्केटबॉल खेळाडू आहेत. त्यांना सिंह सिस्टर्स म्हणूनही ओळखलं जातं.
 

Web Title: Ishant Sharma got his wicket, with a basketball player