शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा ‘विजयोत्सव’

By admin | Updated: October 23, 2015 01:40 IST

विराट कोहलीच्या शानदार शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३५ धावांनी पराभव

चेन्नई : विराट कोहलीच्या शानदार शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या विजयामुळे मुंबईत २५ आॅक्टोबरला रंगणाऱ्या सामन्याला अंतिम सामन्याचे स्वरूप आले आहे.भारताने प्रथम फलंदाजी करून ५० षटकांत ८ बाद २९९ फटकावल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला ५० षटकांत ९ बाद २६४ धावा अशी मजल मारता आली. आफ्रिकेची ६ बाद १८५ धावा अशी अवस्था केल्यानंतरही भारताने आपला विजय गृहीत धरला नव्हता. कारण एका बाजूने कर्णधार एबी डिव्हीलियर्स भारताची गोलंदाजी फोडत होता. ९८ चेंडूत शतक झळकावल्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुवनेश्वर कुमारने ४५व्या षटकात एबीचा अडसर दूर करून निर्णायक कामगिरी केली. एबीने १०७ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह ११२ धावांची झुंजार खेळी करुन २२वे एकदिवसीय शतक साकारले.तत्पूर्वी विराट कोहलीचे शतक आणि सध्या फॉर्मशी झगडत असलेल्या सुरेश रैनाची आक्रमक अर्धशतक खेळी या जोरावर भारताने आव्हानात्मक मजल मारली. अखेरच्या षटकांत फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारताला ३०० चा टप्पा पार करण्यात अपयश आले. एकदिवसीय मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. त्यातच संपूर्ण मालिकेत निर्णायक क्षणी नांगी टाकणारी फलंदाजी भारतासाठी डोकेदुखी ठरली होती. टीम इंडियाला सलामीवीर रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, आक्रमणाच्या नादात तो मॉरीसच्या गोलंदाजीवर फाफ डू प्लेसिसकडे झेल देऊन परतला. रोहितने १९ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा काढल्या. शिखर धवन पुन्हा अपयशी ठरल्यानंतर कोहली - रहाणे यांनी १०४ धावांची भागीदारी करून भारताला सावरले. रहाणे ५३ चेंडूत ४ चौकारांसह ४५ धावा काढून बाद झाल्यानंतर कोहली व रैना यांनी हल्ला चढवला. सततच्या अपयशी खेळीने टीका होणाऱ्या रैनाने ५२ चेंडूत ३ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावा चोपल्या. स्टेनने त्याला बाद केले. दुसऱ्या बाजूला कोहलीचा दांडपट्टा सुरू होता. ११२ चेंडूत शतक झळकावल्यानंतर त्याने आणखी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर तो ६ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने १३८ धावा काढून बाद झाला. दरम्यान, अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीयांनी हाराकिरी केली. युवा गोलंदाज कागिसो रबाडाने ४९व्या षटकांत कोहली आणि हरभजन यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून भारताच्या धावसंख्येला ब्रेक दिला, तर अखेरच्या षटकांत धोनी आणि अक्षर पाठोपाठ बाद झाले. रबाडा आणि डेल स्टेन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. धावफलक भारत : रोहित शर्मा झे. प्लेसिस गो. मॉरीस २१, शिखर धवन झे. डीकॉक गो. रबाडा ७, विराट कोहली झे. डीकॉक गो. रबाड १३८, अजिंक्य रहाणे झे. डीकॉक गो. स्टेन ४५, सुरेश रैना झे. डिव्हीलियर्स गो. स्टेन ५३, महेंद्रसिंग धोनी झे. डिव्हीलियर्स गो. स्टेन १५, हरभजन सिंग त्रि. गो. रबाडा ०, अक्सर पटेल नाबाद ४, भुवनेश्वर कुमार धावबाद (स्टेन) ०. अवांतर - १६. एकूण : ५० षटकांत ८ बाद २९९ धावा.गोलंदाजी : डेल स्टेन १०-०-६१-३; कागिसो रबाडा १०-०-५४-३; ख्रिस मॉरीस ९-०-५५-१; आॅरोन फांगिसो ९-०-५१-०; इम्रान ताहीर ९-०-५८-०; फरहान बेहारदीन ३-०-१७-०.दक्षिण आफ्रिका : काँटन्ट डीकॉक झे. रहाणे गो. हरभजन ४३, हाशिम आमला झे. धवन गो. मोहित शर्मा ७, फाफ डू प्लेसिस झे. धोनी गो. पटेल १७, एबी डिव्हीलियर्स झे. धोनी गो. कुमार ११२, डेव्हीड मिल्लर पायचीत गो. हरभजन ६, फरहान बेहारदीन पायचीत गो. मिश्रा २२, ख्रिस मॉरीस धावबाद (रहाणे) ९, अ‍ॅरोन फांगिसो झे. पटेल गो. कुमार २०, डेल स्टेन झे. रहाणे गो. कुमार ६, कागिसो रबाडा नाबाद ८, इम्रान ताहीर नाबाद ४. अवांतर - १०. एकूण : ५० षटकांत ९ बाद २६४ धावा.गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-६८-३; मोहित शर्मा १०-०-४८-१; हरभजन सिंग १०-०-५०-२; अक्षर पटेल १०-०-४०-१, अमित मिश्रा १०-१-५५-१.