शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतापुढे ‘तगडे’ आव्हान

By admin | Updated: October 13, 2016 00:52 IST

पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या भारतीय संघापुढे गुरुवारी (दि. १३) तगड्या ब्राझीलचे आव्हान असेल. पहिल्या १७ वर्षांखालील ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने

पणजी : पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या भारतीय संघापुढे गुरुवारी (दि. १३) तगड्या ब्राझीलचे आव्हान असेल. पहिल्या १७ वर्षांखालील ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने अपराजित कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे विजेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या ब्राझीलचे आव्हान भारतीय संघापुढे असेल. स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांना रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या संघांकडून पराभवाचा सामना करावा लागला. संधी मिळूनही त्याचे रूपांतर विजयात करणे भारतीय खेळाडूंना जमले नाही. भारतीय संघाने विजयासाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला टक्करही दिली. मात्र, सांघिक कामगिरीत भारतीय संघ मागे पडला आहे. या क्षेत्रात सुधारणा करून ब्राझीलविरुद्धचा औपचारिक सामना जिंकणे याच इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक निकोलई अ‍ॅडम हे दक्षिण आफ्रिका आणि रशियाविरुद्धच्या प्रदर्शनावर खुश होते. मात्र, चीनविरुद्ध भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, स्पर्धेत खेळाडूंनी एक विरोधी संघ म्हणून सिद्ध केले आहे. आम्ही रशिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना चांगली टक्कर दिली. संधीचा फायदा उठवता आला असता तर निकाल काही वेगळा असता. खेळाडूंच्या कामगिरीत बऱ्याच सुधारणा झाल्या असून ते चांगले संकेत आहेत. गेल्या चीनविरुद्धच्या सामन्यात संघातील प्रमुख खेळाडू अपयशी ठरले होते. आम्ही या सामन्यात दबदबा निर्माण केला होता. हा सामना आम्हीच जिंकायला हवा होता. मात्र, आम्ही संधीचा फायदा उठवू शकलो नाही. अतिम क्षणी झालेल्या गोलने आमच्या आशेला धक्का दिला. उद्याच्या सामन्यासाठी संघ सज्ज असून आम्ही विजयाचा प्रयत्न करणार आहोत.