शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा जीतू राय आॅलिम्पिकसाठी पात्र

By admin | Updated: September 10, 2014 02:41 IST

भारताचा नवा पिस्तुल किंग आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन जीतू राय याने स्पेनच्या ग्रेनाडा येथे सुरू

नवी दिल्ली : भारताचा नवा पिस्तुल किंग आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन जीतू राय याने स्पेनच्या ग्रेनाडा येथे सुरू असलेल्या ५१ व्या आयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल इव्हेंटमध्ये रौप्य पदक पटकाविताना २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविली. जीतू आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारा भारताचा पहिला नेमबाज ठरला. सेनेच्या या २५ वर्षीय नेमबाजाचे सुवर्णपदक थोड्या फरकाने हुकले. जीतूने अंतिम फेरीत २० शॉटमध्ये १९१.१ चा स्कोअर नोंदविला तर दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन असलेल्या दक्षिण कोरियाच्या विश्व विक्रमवीर जिन जिंगोहने १९२.३ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाचा मान मिळविला. चीनच्या आॅलिम्पिक चॅम्पियन पेंग वेई याला या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. होआंग जुआन विन्ह चौथ्या स्थानावर राहिला. त्याने अखेरचा आॅलिम्पिक कोटा मिळविला. आयएसएसएफ विश्व रॅन्किंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या जीतूची यंदाच्या मोसमातील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. जीतूने विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाचा मान मिळवित २०१४ मध्ये सलग पाचवे आंतरराष्ट्रीय पदक पटकाविले. दरम्यान, अयोनिका पॉल हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकाविणाऱ्या अयोनिकाने ६२०.८ गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. महिला एअर रायफल स्पर्धेत ६ स्पर्धकांना आॅलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. ५० मीटर पिस्तुल स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या गुरपाल सिंगला ६०० पैकी ५५० गुण पटकाविता आले. त्याला ३३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. ओमप्रकाश (५४८ गुण) ३८ व्या स्थानी राहिला. ट्रॅप स्पर्धेतील माजी विश्व चॅम्पियन मानवजित संधूने परफेक्ट कामगिरी करताना चार पात्रता फेरीत १०० पैकी १०० चा स्कोअर नोंदविला. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणइंदर सिंग यांनी जीतूचे अभिनंदन केले. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला, असेही रणइंदर सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)