शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

“१०० मीटरवर मोठा स्फोट झाला अन्…”; पी.व्ही.सिंधूंने सांगितला दुबई विमानतळाचा थरारक घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 15:34 IST

PV Sindhu On Dubai Airport News: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू दुबई विमानतळावर अडकली असून, तेथील आपबीती सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

PV Sindhu On Dubai Airport News: अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये २०० पेक्षा अधिक जण ठार झाले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. अद्यापही अनेक ठिकाणी हल्ले सुरूच आहेत. मध्य पूर्वेतील देशांमधील तणाव वाढताना पाहायला मिळत आहे. यातच भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू 'ऑल इंग्लंड' स्पर्धेसाठी जाताना दुबई विमानतळावर अडकली. एका सुरक्षित ठिकाणाहून पी.व्ही.सिंधू हिने त्या ठिकाणी घडलेला थरारक प्रसंग शेअर केला आहे.

पी.व्ही.सिंधू हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, दुबई विमानतळावर घडलेली आपबीती सांगितली आहे. या व्हिडिओत पी.व्ही.सिंधू म्हणते की, मला एक अपडेट शेअर करायची आहे. सर्वप्रथम आमच्याशी संपर्क साधणाऱ्या आणि आमची काळजी करणाऱ्या सर्वांचे आभार मानते. मी बेंगळुरूहून ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी यूकेमधील बर्मिंगहॅमला जात होतो. आमचे विमान दुबईत उतरल्यानंतर सर्व परिस्थिती बिकट झाली. आमच्या नियंत्रणाबाहेरील घटना घडू लागल्या. अवघ्या काही तासातच हवाई क्षेत्र बंद करण्यात आले, अशी माहिती पी.व्ही.सिंधू हिने दिली. 

अगदी जवळ एक स्फोट झाला

गेल्या काही तासांपासून खूप तणाव होता. आम्हाला विमानांचे आवाज ऐकू येत होते. काही तासांनंतर दुबई विमानतळावर आम्ही जिथे अडकलो होतो, त्याच्या अगदी जवळ एक स्फोट झाला. माझे प्रशिक्षक त्या ठिकाणापासून जवळजवळ १०० मीटर अंतरावर होते. त्याला लगेच त्या भागातून बाहेर पडावे लागले. इतक्या जवळच्या ठिकाणी असे काहीतरी अनुभवणे खरोखर हादरवून टाकणारे होते. तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या कोणाशीही अशा गोष्टी घडतील, अशी तुम्ही कधीच अपेक्षा करत नाही. परंतु कधीकधी परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असते. माझ्यासोबत मजबूत आणि एकजूट टीम असल्याने मी खूप भाग्यवान समजते. प्रत्येकाने संयम दाखवला. एकमेकांना पाठिंबा दिला. अतिशय भयानक परिस्थितीत खरी ताकद दाखवली, असे पी.व्ही.सिंधूने म्हटले आहे. 

आत्ता आम्ही सुखरूप आहोत आणि सुरक्षित ठिकाणी आहोत. दुबईतील भारतीय उच्चायुक्तांनीही मोलाचे सहकार्य केले. आम्ही अडकले आहोत, याची माहिती मिळताच त्यांनी वेगाने पावले उचलली आणि आम्हाला मदत केली. केवळ आम्हाला नाही, तर इथे अडकलेल्या बाकीच्यांनाही मदत मिळवून दिली. या कठीण परिस्थिती ते सातत्याने आमच्या संपर्कात होते. परिस्थिती सामान्य होण्याची आम्ही सगळे जण वाट पाहत आहोत. सगळ्यांना पुन्हा धन्यवाद, असे पी.व्ही.सिंधूने सांगितले.

दरम्यान, दुबई विमानतळावरील सर्वच कर्मचारी अखंडपणे न थकता सगळ्यांची काळजी घेत आहेत. सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करत आहेत. इथे शेकडो जण अडकले आहेत. या सर्वांची काळजी येथील कर्मचारी अव्याहतपणे घेत आहेत या सर्वांना धन्यवाद देते, असेही ती म्हणाली.

English
हिंदी सारांश
Web Title : PV Sindhu recounts harrowing Dubai airport explosion experience amid tensions.

Web Summary : PV Sindhu detailed a terrifying experience at Dubai airport en route to a badminton championship. A nearby explosion and regional tensions caused significant disruption. Sindhu expressed gratitude for the support received and highlighted the airport staff's dedication to passenger safety during the ordeal.
टॅग्स :warयुद्धDubaiदुबईPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाIndiaभारतIndiaभारत